मुंबईत उसंत, राज्यात जोर‘धार’! नाशिकमध्ये गोदावरीला पूर
गेले तीन दिवस मुंबईसह महाराष्ट्राला झोडपलेल्या पावसाने आज मात्र मुंबईत उसंत घेतली. मात्र राज्याच्या अनेक भागात जोरदार पाऊस बरसल्याने जनजीवन विस्कळीत झाले. नाशिकमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरीला पूर आला. रत्नागिरीमध्येही पावसाचा जोर कायम असून 32 धरणे तुंडुंब भरून वाहू लागली आहेत.
मुंबईसह राज्याच्या अनेक भागांत तीन दिवस अक्षरशः धुमाकुळ घातलेल्या पावसाने विश्रांती घेतली असली तरी नाशिकसह कोकणाच्या अनेक भागांत जोरदार सरी बरसल्या. नाशिकमध्ये पुरामुळे दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी पोहोचले. गंगा-गोदावरी मंदिर अर्ध्याहून जास्त पाण्याखाली गेले. इगतपुरीमधील तीन पाडयांशी संपर्क तुटला. त्यामुळे विद्यार्थ्यांना जीवघेणा प्रवास करावा लागला. दरम्यान, अतिवृष्टीमुळे मुंबईसह राज्यभरात चार दिवसांत 21 जणांचा मृत्यू झाला आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List