एज इज जस्ट नंबर, आगे आगे देखो होता है क्या। गणेश नाईकांचा मिंधेंना इशारा
एज इज जस्ट नंबर, आगे आगे देखो होता है क्या, असा इशारा भाजपचे नेते आणि राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी मिंधे गटाला दिला आहे. पालघर येथील एका कार्यक्रमात नाईक यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली होती. त्यावर तिळपापड झालेले मिंधे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी नाईकांचे वय झाले आहे अशी मुक्ताफळे उधळली. त्याला नाईक यांनी साडेतोड जबाब दिला.
गणेश नाईक : एकनाथ शिंदेंना लॉटरी लागली. पण कमवलेले टिकवता आले पाहिजे. आपण कसे कमवतो, कोणत्या मार्गाने कमवतो ते महत्त्वाचे आहे.
नरेश म्हस्के : नाईकांचे वय झाले आहे. त्यांची बॅटरी डिफ्यूज झाली होती. महायुतीचे सरकार आल्यामुळे ती पुन्हा चार्ज झाली आहे.
गणेश नाईक : वय हा फक्त एक बहाणा आहे. भविष्यात काय होते ते बघाच.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List