फडणवीस राज्यपालांना भेटले मिंधे काळोखात शहांना भेटले, काहीतरी घोटाळा झालाय

फडणवीस राज्यपालांना भेटले मिंधे काळोखात शहांना भेटले, काहीतरी घोटाळा झालाय

काहीतरी मोठा घोटाळा झालाय असे दिसते. शहा सेनेचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दिल्लीत पोहचले आणि काळोखात गृह मंत्री अमित शहा यांना भेटले तर दुसरीकडे बुधवारी रात्रीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांची भेट घेतली. या घडामोडींवरून अनेक तर्क लावले जात आहेत.

शिंदे गटाचे मंत्री व त्यांच्या निकटवर्तीयांना आलेल्या ईडी, इन्कम टॅक्सच्या नोटिसा, झारखंड मद्य घोटाळय़ात अटक झालेल्या अमित साळुंखेचे श्रीकांत शिंदे फाऊंडेशनशी असलेले कनेक्शन यामुळे उपमुख्यमंत्री शिंदे यांची झोप उडाली आहे. त्यातच आयएएस अधिकारी अनिलकुमार पवार यांच्या कारनाम्यामुळे नगरविकास खाते ईडीच्या रडारवर आले. वसई-विरार पालिकेच्या आयुक्तपदाचा कार्यभार सोडताच पवारांवर पडलेले ईडीचे छापे यामुळे एकनाथ शिंदे यांच्या पुढील अडचणी वाढताना दिसत आहेत. गेल्याच आठवडय़ात गृहमंत्री अमित शहा यांनी मंत्री व लोकप्रतिनिधींच्या कारनाम्यांमुळे सरकार बदनाम होत असेल तर त्याला आवर घाला, असे स्पष्ट आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहेत. या पार्श्वभूमीवर शिंदे यांनी शहा यांची भेट घेऊन आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. तसेच मला वाचवा असे आर्जव या भेटीत शिंदे यांनी केल्याची चर्चा आहे.

शासकीय गाडी बदलून गुपचूप गाठीभेटी

एकनाथ शिंदे रात्री एक वाजण्याच्या सुमारास खासदार श्रीकांत शिंदे 12 पंत मार्गावरील निवास्थानातून बाहेर पडले. कोणाच्याही नजरेस येऊ नये यासाठी शासकीय गाडी बदलून साध्या गाडीतून शिंदे यांनी प्रवास करत अमित शहा यांचे घर गाठवले गुपचूप भेट घेतली.

फडणवीसांकडून जाणीवपूर्वक त्रास

शिंदे गटाच्या मंत्री, आमदार, खासदारांना वरचेवर ईडी व इन्कम टॅक्सच्या नोटिसा येत आहेत. यामुळे पक्षामध्ये मोठी अस्वस्थता आहे. संजय शिरसाट, योगेश कदम आदी मंत्र्यांशी संबंधित प्रकरणांना विनाकारण हवा दिली जात आहे. मुख्यमंत्री फडणवीस जाणीवपूर्वक त्रास देऊन शिंदे गटाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत असल्याची शंका आहे, अशी तक्रार शिंदे यांनी शहा यांच्याकडे केली.

शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यापासून मीडिया लांब

दिल्ली दौऱयावर असलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही उद्योजकांशी बैठका घेतल्या. तसेच खासदारांच्या मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न त्यासाठी आवश्यक पाठपुरावा याबाबत बैठक घेऊन खासदारांना मार्गदर्शन केले. एरव्ही बातम्यांमध्ये झळकण्यासाठी माध्यमांना जवळ करणाऱया शिंदे यांनी दिल्ली दौऱयापासून मीडियाला लांब ठेवले.

फडणवीस अचानक राजभवनावर

मिंधे दिल्लीत असतानाच मुख्यमंत्री फडणवीस बुधवारी रात्री थेट राजभवनावर पोहचले. त्यांनी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेतली. या भेटीत राज्यपालांसोबत फडणवीसांची नेमकी काय चर्चा झाली, ही माहिती बाहेर येऊ शकलेली नाही. फडणवीसांनीही या भेटीवर कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाही.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

देशाची राजकीय व्यवस्था बिघडलीय, ती दुरुस्त करण्यास मी सक्षम नाही; कमला हॅरिस यांनी राजकारण सोडण्याची केली घोषणा देशाची राजकीय व्यवस्था बिघडलीय, ती दुरुस्त करण्यास मी सक्षम नाही; कमला हॅरिस यांनी राजकारण सोडण्याची केली घोषणा
अमेरिकेच्या माजी उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांनी राजकारण सोडण्याची घोषणा केली आहे. ‘द लेट शो विथ स्टीफन कोल्बर्ट’ या कार्यक्रमात दिलेल्या...
Navi Mumbai Accident – तुर्भेत चालकाचे नियंत्रण सुटले अन् NMMT बसने सहा जणांना उडवले
मुंबई-कोलकाता विमान प्रवासात सहप्रवाशाला दिली थप्पड; व्हिडिओ व्हायरल
माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी अखेर शासकीय बंगला सोडला; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला लिहिले होते पत्र
एअर इंडियाच्या विमानाला 11 तासांचा विलंब; दिल्लीला येणारे प्रवासी लंडनमध्ये खोळंबले
मिंधे गटाच्या नेत्याला 50 लाखांच्या खंडणी प्रकरणात अटक, मुंबईतील एमआयडीसी पोलिसांकडून कारवाई
Ratnagiri News – प्री-पेड विद्युत मीटर सक्ती विरोधात दापोलीत महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा एल्गार