राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहेच, आता तो विधानभवनापर्यंत पोहोचला आहे – अंबादास दानवे

राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहेच, आता तो विधानभवनापर्यंत पोहोचला आहे – अंबादास दानवे

विधानभवनात जितेंद्र आव्हाड आणि भाजप आमदार गोपिचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या मारामारीच्या घटनेची निष्पक्ष चौकशी व्हायला हवी, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विधानभवनात केली. तसेच या प्रकरणावर विधान परिषदेत चर्चा देखील व्हायला हवी असे ते म्हणाले.

”विधानभवन हे लोकशाहीचं एक मंदिर आहे. असे असताना विधानभवनात ज्या प्रकारे माऱा माऱ्या झाल्या ते आपल्या सर्वांना लाजिरवाण्या वाटाव्या अशा आहेत. हे होत असताना विधानभवनाच्या तळममजल्यावर समर्थकांची बाचाबाची झाली. विधानभवनाच्या आतमध्ये घटना घडली. आपण या प्रांगणाचे प्रमुख आहेत. इथे कोण येतं हे पाहणं आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. काल ज्या पद्धतीने मारामारी झाली हे अत्यंत लाजिरवाणं आहे. आपल्या सर्वांना गंभीर दखल घेण्याची आवश्यकता आहे. राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न आहेच पण आता तो विधानभवनापर्यंत पोहोचला आहे”, असे दानवे म्हणाले.

”पडळकर, आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांच्या मारा माऱ्या झाला. त्याचे व्हिडीओ समोर आले. त्यात दिसतंय की सत्ताधारी पक्षाचा आमदार कार्यकर्त्यांना उचकवताना दिसतोय. त्यानंतर मारहाण होते. विधानभवनाच्या आवारात तरी पोलिसांनी एकांगी कारवाई केली नाही पाहिजे. एकाला अटक होते आणि दुसऱ्याला पोलीस तंबाखू मळून देत आहेत. हे अत्यंत दुर्दैवी आहे. विधान भवन हे सर्वोच्च आहे, इथली कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असतील तर त्याची निष्पक्ष चौकशी व्हायला हवी आणि 289 नुसार त्यावर चर्चा देखील व्हायला हवी’, असे दानवे यांनी सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Ratnagiri News – महावितरणच्या हलगर्जीपणाचे दोन बळी, विद्युत तारांना स्पर्श होऊन तरुणांचा मृत्यू Ratnagiri News – महावितरणच्या हलगर्जीपणाचे दोन बळी, विद्युत तारांना स्पर्श होऊन तरुणांचा मृत्यू
महावितरणच्या पडलेल्या विद्युतभारीत तारांना स्पर्श झाल्याने वीजेचा धक्का बसून दोघांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रत्नागिरी तालुक्यातील निवळी गावात घडली. हे...
माध्यमांसमोर बेताल बडबड आली अंगलट, नितेश राणे माझगाव कोर्टात हजर राहणार; वकिलांची दंडाधिकारी न्यायालयात हमी
कोकणात जंगलांना जाणीवपूर्वक वणवे लावले जातात, गुन्हेगारांवर कारवाई होणार का? विधानसभेत भास्कर जाधव यांचा सवाल
Ratnagiri News – कोकण महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या घशात घालण्याचा सरकारचा डाव, विनायक राऊत यांचा आरोप
Jammu Kashmir – भरधाव ट्रकची कारला धडक, अपघातात अमरनाथला चाललेले 8 भाविक जखमी
Video – विधानभवनातील राड्यावर अंबादास दानवे काय म्हणाले?
सत्तेचे माजकारण! संपूर्ण देशात महाराष्ट्राला शरमेने मान खाली घालावी लागेल, अशी मालिका राज्यात सुरू – उद्धव ठाकरे