Mumbai News – जुहूच्या समुद्रात दोन मुलं बुडाली, एकाला वाचवण्यात यश; दुसऱ्याचा शोध सुरू
पोहण्यासाठी गेलेली दोन अल्पवयीन मुलं जुहूच्या समुद्रात बुडाली. एकाला वाचवण्यास जीवरक्षकांना यश आले असून दुसरा बेपत्ता आहे. शुक्रवारी सकाळी 8.30 वाजण्याच्या सुमारास जुहूमधील गोदरेज गेटजवळील सिल्व्हर बीचवर ही घटना घडली. बेपत्ता झालेल्या मुलाचा युद्धपातळीवर शोध सुरू आहे.
बेपत्ता मुलाचा ओळख अद्याप पटलेली नाही. तो स्थानिक होता की पर्यटक याबाबतही तपास सुरु आहे. दोन्ही मुलं सकाळी भरतीच्या पाण्यात पोहण्यासाठी गेली होती. मात्र दोघेही बुडू लागले. ड्युटीवर असलेल्या जीवरक्षकांनी तात्काळ धाव घेत एका मुलाला वाचवले. मात्र दुसरा मुलगा लाटेबरोबर समुद्रात खेचला गेला.
घटनेची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दल, स्थानिक पोलीस, बीएमसी के-वेस्ट वॉर्ड अधिकारी आणि 108 आपत्कालीन वैद्यकीय सेवा जुहू बीचवक दाखल झाले. मुलाचा शोध घेण्यासाठी युद्धपातळीवर शोधमोहिम सुरू आहे. गोताखोर, बचाव बोटी आणि समुद्रकिनाऱ्यावरील देखरेख पथके या मोहिमेत तैनात करण्यात आली आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List