मानाच्या गणपतींपाठोपाठ यंदा भाऊसाहेब रंगारी, मंडई मंडळ; गणेश विसर्जन मिरवणूक वेळेत संपविण्यासाठी निर्णय

मानाच्या गणपतींपाठोपाठ यंदा भाऊसाहेब रंगारी, मंडई मंडळ; गणेश विसर्जन मिरवणूक वेळेत संपविण्यासाठी निर्णय

वैभवशाली गणपती विसर्जन मिरवणुकीत लक्ष्मी रस्त्यावरून सहभागी होणारे अखिल मंडई मंडळ आणि श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट या मंडळांनी यंदा विसर्जन मिरवणुकीसंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, दोन्ही मंडळे मानाच्या पाचव्या गणपती पाठोपाठ मिरवणुकीत सहभागी होणार आहेत. मानाचे पाच गणपती टिळक पुतळ्यापासून मार्गस्थ झाल्यानंतर ही मंडळे त्या पाठोपाठ मिरवणुकीत सहभागी होतील. विसर्जन मिरवणूक वेळेत पार पडण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे विश्वस्त, उत्सवप्रमुख पुनीत बालन, अध्यक्ष संजीव जावळे, अखिल मंडई मंडळाचे संजय मते, विश्वास भोर आदी उपस्थित होते.

अण्णा थोरात म्हणाले, गणेशोत्सव हा धार्मिक उत्सव असून, संपूर्ण दहा दिवस त्याचे महत्त्व आहे. त्यातील सगळ्यात महत्त्वाचा दिवस म्हणजे विसर्जन, यावर्षी अनंत चतुदर्शी (दि.6 सप्टेंबर) च्या दुसऱ्या दिवशी (दि. 7) खग्रास चंद्रग्रहण असल्याने ग्रहणकाळात देवाच्या सर्व मूर्ती झाकून ठेवण्याची प्रथा आहे. त्यामुळे दुपारी 12 पूर्वी मंडळांच्या मूर्ती मंदिरात पुन्हा येणे आवश्यक आहे. मागील तीन वर्षे पोलिसांनी दिलेल्या वेळेस 7 वा. ‘श्रीं’ची आरती करून मिरवणुकीत सामील होण्यासाठी तयार असतो; पण गेली काही वर्षे पोलीस प्रशासनाने शब्द पाळला नाही. त्यामुळे सायंकाळी मिरवणुकीत सामील होण्यासाठी आम्ही तयार असूनही आम्हाला वेळेवर सहभागी करून घेण्यात आलेले नाही. त्यामुळे यंदा आम्ही हा निर्णय घेतला आहे. सर्व गणेशोत्सव मंडळांना देखील आम्ही आवाहन करीत आहोत की, यंदा मिरवणूक रविवारी दुपारी 12 पूर्वी संपवावी.

यावेळी बोलताना पुनीत बालन म्हणाले, ग्रहणकाळ असल्यामुळे मिरवणूक लवकर संपविणे आवश्यक असून, आम्ही मानाचे पाच गणपती टिळक पुतळा चौकातून मार्गस्थ झाल्यानंतर त्या पाठोपाठ मिरवणुकीत सहभागी होणार आहोत. सर्व गणेशमंडळांनीदेखील याबाबत सहकार्य केल्यास पोलीस आणि प्रशासन यंत्रणेवरील ताण कमी होण्यास मदत होईल.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

पिंपरी-चिंचवड चाकण हाऊसिंग सोसायटी संघटनेच्या पाठपुराव्याला यश पिंपरी-चिंचवड चाकण हाऊसिंग सोसायटी संघटनेच्या पाठपुराव्याला यश
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने मोठ्या गृहनिर्माण सोसायट्यांकडून ओला कचरा उचलण्यास नकार देणाऱ्या निर्णयाला अखेर मवाळ भूमिका घेत, ओला कचरा पूर्ववत उचलण्याचा निर्णय...
‘‘ॲल्युमिनिअम मॅन ऑफ इंडिया’’ उद्योजक भरत गीते यांना ‘‘महाराष्ट्र उद्योग भूषण’’ पुरस्कार!
मोठ्या प्रकल्पांपेक्षा मूलभूत सुविधा सोडविण्यावर भर द्या : खासदार श्रीरंग बारणे 
नागरिकांच्या आरोग्यदायी, सक्रिय आणि आनंदी जीवनशैलीसाठी आवश्यक सार्वजनिक सुविधा उभारण्यावर भर : महापौर रवि लांडगे
पिंपरी-चिंचवडमध्ये उन्नती सोशल फाऊंडेशन तर्फे १००० वृक्षांचे वाटप
Kokan News – प्लास्टिक कचरा गोळा करणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार बक्षीस; सृजन सायन्स सेंटरचा अभिनव उपक्रम
परतीच्या पावसाने कापलेली भात शेती पुन्हा रुजली, ऑक्टोबर महिना संपला तरीही पाऊस सुरूच