Pune News – दौंडमधील यवतमध्ये दोन गटात वाद, एकमेकांवर केली दगडफेक; नेमकं काय घडलं?
सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याने पुण्याच्या दौंड तालुक्यात यवतमध्ये दोन गटात जोरदार राडा झाला. शुक्रवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. दोन गटाने एकमेकांवर तुफान दगडफेक केली. तसेच परिसरात जाळपोळही केली. घटनेची माहिती मिळताच यवत पोलिसांनी तात्काळ धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. घटनास्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
यवतमध्ये छत्रपती शिवाजी महाराज मूर्तीची विटंबना झाल्याची घटना 26 जुलैला घडली होती. तेव्हापासून गावात तणावाचे वातावरण आहे. त्याच अनुषंगाने 1 ऑगस्ट रोजी सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हायरल पोस्टनंतर दोन गटात उद्रेक झाला. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत परिस्थिती नियंत्रण आणली. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याचे यवत पोलिसांनी सांगितले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List