नगरमधील बनावट नोटांचे रॅकेट उद्धवस्त; 88 लाखांचा मुद्देमाल जप्त

नगरमधील बनावट नोटांचे रॅकेट उद्धवस्त; 88 लाखांचा मुद्देमाल जप्त

नगर तालुका पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने बनावट चलनी नोटांचे रॅकेट उघडकीस आणत मोठी कारवाई केली. 27 जुलै 2025 रोजी आंबीलवाडी शिवारात पाचशे रुपयांच्या बनावट नोटांसह फिरणाऱ्या निखील शिवाजी गांगर्डे (वय 27, रा. कुंभळी, ता. कर्जत) आणि सोमनाथ माणिक शिंदे (वय 25, रा. तपोवन रोड) यांना महिंद्रा थार गाडीतून ताब्यात घेतले.

सपोनी प्रल्हाद गिते यांनी मिळालेल्या गोपनीय माहिती मिळाली की, दोन संशयित काळ्या महिंद्रा थारमधून बनावट नोटा घेऊन आंबीलवाडी शिवारात सिगारेट खरेदी करत आहेत. पथकाने तात्काळ सापळा रचून निखील गांगर्डे आणि सोमनाथ शिंदे यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 80 हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या.

पोलिसांनी 59 लाख 50 हजार रुपयांच्या बनावट नोटा, 2 लाख 16 हजर रुपयांचे कागद आणि शाई, तसेच 27 लाख 90 हजार 600 रुपयांचे मशीन, संगणक आदी साहित्य जप्त केले. एकूण 88 लाख 20 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. या कारवाईत सपोनी प्रल्हाद गिते, पोसई भरत धुमाळ, पोहेकॉ सुभाष थोरात, रविकिरण सोनटक्के, बाबासाहेब खेडकर, मंगेश खरमाळे, शरद वांढेकर, खंडू शिंदे, सागर मिसाळ, राजू खेडकर, विक्रांत भालसिंग आणि मोहिनी कर्डक यांचा सहभाग होता. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे आणि उपविभागीय अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. अंबादास ससाणे फरार असून, त्याचा शोध सुरू आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;