पॉवर कटमध्ये हिंदुस्थान जगात पुढे
सर्वात मोठय़ा प्रमाणात वीजपुरवठा खंडित होण्याचा नकोसा असा जागतिक रेकॉर्ड हिंदुस्थानच्या नावावर आहे. जगातील विजेचा पॉवर कट होण्याच्या 10 मोठय़ा घटना पाहिल्या तर त्यातील सात घटना हिंदुस्थान, पाकिस्तान आणि बांगलादेशात घडलेल्या आहेत.
हिंदुस्थानात 30-31 जुलै 2012 रोजी मोठा पॉवर कट झाला होता. त्यावेळी पाच पैकी 3 पॉवरग्रीड फेल झाल्याने त्याचा परिणाम 20 राज्यांच्या वीज पुरवठय़ावर झाला होता. सुमारे 62 कोटी लोकांना याचा फटका बसला होता. सगळीकडे अंधार पसरला होता, रेल्वे सेवा विस्कळीत झाली. त्याखालोखाल पाकिस्तानात 23 जानेवारी 2023 रोजी सर्वात मोठा पॉवर कट झाला. ग्रीड फेल झाल्याने अख्ख्या पाकिस्तानची पॉवर कट झाली. याचा सुमारे 23 कोटी लोकांना फटका बसला. पाकिस्तानी नागरिक 12 तास अंधारात होते. त्यानंतर वीज खंडीत होण्याचे तिसरे मोठे प्रकरण उत्तर प्रदेशात घडले. उत्तर प्रदेशातील एका सबस्टेशनमध्ये तांत्रिक बिघाड होऊन संपूर्ण उत्तरेकडील पॉवरग्रीड फेल झाले. सुमारे 23 कोटी लोक 12 तास अंधारात होते.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List