SIR विरोधात झारखंड विधानसभेत प्रस्ताव मांडणार, मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची माहिती

SIR विरोधात झारखंड विधानसभेत प्रस्ताव मांडणार, मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची माहिती

बिहारमध्ये मतदारयाद्यांची विशेष सखोल फेरतपासणी (Special Intensive Revision) वादंग सुरू आहे. त्यामुळे झारखंडमध्ये या प्रक्रियेविरोधात प्रस्ताव सादर होणार आहे. झारखंडमध्ये इंडिया आघाडीचे आमदार मतदारयाद्यांची विशेष सखोल फेरतपासणी (SIR) विरोधात प्रस्ताव सादर करणार आहेत.

या प्रस्तावावर अधिवेशनात चर्चा होईल. विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना तार्किक उत्तरं दिली जातील असेही इंडिया आघाडीने ठरवलं आहे. शुक्रवारपासून पावसाळी अधिवेशन सुरू होणार असून 7 ऑगस्टला संपणार आहे. पाच दिवस हे अधिवेशन चालणार आहे.

गुरुवारी इंडिया आघाडीची बैठक झाली. मुख्यमंत्री हेमंत सोरेन म्हणाले की, या बैठकीत अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली, ज्यामध्ये बिहारमधील SIR प्रकरणाचाही समावेश होता. INDIA आघाडी निवडणूक आयोगाच्या निर्णयाच्या विरोधात आहे आणि आम्ही याचा निषेध करतो,” असेही सोरेन म्हणाले.

अधिवेशनादरम्यान विधानसभा SIR प्रकरणाच्या विरोधात ठराव मंजूर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे अशी माहिती संसदीय कामकाज मंत्री राधाकृष्ण किशोर यांनी दिली. मुख्य विरोधी पक्ष असलेल्या भाजपकडून पावसाळी अधिवेशनासाठी त्यांची रणनीती ठरवण्यासाठी शुक्रवारी विधिमंडळ पक्षाची बैठक घेण्यात येणार आहे. याआधी, सभापती रवींद्रनाथ महतो यांनी सर्वपक्षीय बैठक घेऊन अधिवेशन सुरळीत व यशस्वी पार पाडण्यासाठी सर्व सदस्यांकडून सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;