श्रीनगरमध्ये तैनात बीएसएफ जवान बेपत्ता, शोधमोहीम सुरू
श्रीनगर येथे तैनात असलेला बीएसएफ जवान गुरुवारी रात्रीपासून बेपत्ता झाल्याचे उघडकीस आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बटालियन मुख्यालयातून हा जवान बेपत्ता झाला आहे. सुगम चौधरी असे बेपत्ता जवानाचे नाव असून ते पंथाचौक येथे तैनात असलेल्या 60 व्या बटालियनचे सदस्य आहेत.
सुगम चौधरी यांचा शोध घेण्यासाठी व्यापक शोध मोहीम राबविण्यात येत आहे. आजूबाजूच्या परिसरात शुक्रवारी शोध घेऊनही चौधरी यांचा शोध लागला नाही. बेपत्ता जवानाची तक्रार नोंदवण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. सुगम चौधरी हे मूळचे उत्तर प्रदेशचे रहिवासी आहेत. त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधण्यात आला आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List