Navi Mumbai Accident – तुर्भेत चालकाचे नियंत्रण सुटले अन् NMMT बसने सहा जणांना उडवले
चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव बसने सहा जणांना धडक दिल्याची घटना समोर आली आहे. नवी मुंबईतील तुर्भे परिसरात ही घटना घडली. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी बस चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. अपघाताबाबत पुढील तपास सुरू आहे.
तुर्भे नाका परिसरात फायझर कंपनी रोड स्ट्रीचजवळ एनएमएमटीच्या इलेक्ट्रीक बस चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. अतिवेगात बस चालवत असल्याने हा अपघात घडल्याची माहिती मिळते. नियंत्रण सुटल्याने भरधाव बसने सहा पादचाऱ्यांना धडक दिली. तुर्भे पोलिसांनी चालक प्रमोद कनोजियाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अपघातग्रस्त बस देखील पोलिसांनी जप्त केली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List