माणिकराव कोकाटेंच्या संपत्तीत 20 वर्षांत भरमसाठ वाढ, अंजली दमानिया यांनी केली पोलखोल
विधिमंडळ सभागृहात सभागृहातील प्रकारानंतर ‘रमीपटू’ माणिकराव कोकाटे यांचं खातं बदलण्यात आलं आहे. कोकाटेंकडे क्रीडा खात्याचा कार्यभार सोपविण्यात आला आहे तर दत्तात्रय भरणे यांच्याकडे कृषी खात्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. यातच आता माणिकराव कोकाटे यांच्या संपत्तीबद्दल एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. गेल्या 20 वर्षात माणिकराव कोकाटे यांच्या संपत्तीत भरमसाठ वाढ झाली आहे, असा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे.
अंजली दमानिया यांनी आज पत्रकार परिषद घेत कोकाटे यांच्या संपत्तीबद्दल माहिती दिली. त्या म्हणाल्या आहेत की. “माणिकराव कोकाटे हे शेतकरी आहेत. ते 1999 मध्ये राजकारणात आले, त्यानंतर 2014 चे अॅफिडेव्हिट आहे, त्यात 6 कोटींची संपत्ती होती. 2019 मध्ये ती 21 कोटी इतकी झाली. पुढे 2024 मध्ये तब्बल 48 कोटी रुपये इतकी संपत्ती झाली”, अशी माहिती त्यांनी दिली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List