हिंमत असेल तर सीबीआय चौकशी करा; एकनाथ खडसे यांचे गिरीश महाजनांना आव्हान
राज्य सरकारमधील मंत्री गिरीश महाजन आणि राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांच्यातील शाब्दिक युद्ध राजकीय चर्चेचा विषय नेहमीच ठरत असते. दोन्ही नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत करतात. आता या दोन्ही नेत्यांमध्ये हनी ट्रॅपप्रकरणातील आरोपी प्रफुल लोढा प्रकरणावरुन दोन्ही नेत्यांमध्ये चांगलीच जुंपली आहे. आता गिरीश महाजन यांनी थेट एकनाथ खडसेंच्या मुलाचे हत्याप्रकरण चर्चेत आणल्याने खळबळ उडाली आहे.
एकनाथ खडसे यांच्या मुलाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला होता हे उघड झाले पाहिजे. खडसेंनीच त्यांच्या मुलाचा खून केला, असे प्रफुल लोढाने सांगितल्याचा दाखला गिरीश महाजन यांनी दिला होता. आता, महाजनांच्या या दाव्यावर एकनाथ खडसेंनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. हिंमत असेल तर या प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी, असे आव्हानच खडसेंनी महाजन यांना दिले आहे.
माझ्या मुलाच्या प्रकरणात गिरीश महाजनला आव्हान आहे की, माझ्या एकुलत्या एक मुलाच्या खुनाचा आरोप माझ्यावर करतात, हिमंत असेल तर तात्काळ याप्रकरणाची चौकशी करा, असे आव्हान एकनाथ खडसेंनी दिले आहे. निखिल खडसेंचा मृत्यू झाला त्यावेळी 3 दिवस मी घरीच नव्हतो, त्याच्या मृत्यूच्या दिवशी देखील नव्हतो. माझ्याकडे जमिनीशिवाय काहीच नाही, गिरीश महाजन हा शाळा मास्तरचा पोरगा, मग याच्याकडे इतका पैसा कुठून आला? त्यांच्या जावयाच्या नावाने संपत्ती ठेवली आहे. त्यांचा तीन बत्ती येथे फ्लॅट आहे, तो किती किमतीचा आहे याची माहिती घ्या? असे म्हणत गिरीश महाजनांच्या मालमत्तेवर खडसेंनी सवाल उपस्थित केले आहेत.
प्रफुल लोढावर आत्ताच कसे गुन्हे दाखल व्हायला लागले. अंधेरीला गुन्हा दाखल झाला, साकीनाका पोलीस ठाण्यातही गुन्हा दाखल झाला आहे. एकाच डीसीपीच्या अंतर्गत गुन्हा दाखल कसा काय होतोय? असा सवालही एकनाथ खडसेंनी उपस्थित केला आहे. सध्या लोढावर वेगवेगळे गुन्हे दाखल होत आहेत, तीन ठिकाणी हनी ट्रॅफ प्रकरणात लोढावर गुन्हे दाखल आहेत. गिरीश महाजन हॉटेल ट्रायडन येथे माझे तीन महिने पाय धरत होते असं प्रफुल लोढा यांनी म्हंटल आहे. नेमकं काय आहे ट्रायडेंट हॉटेल प्रकरण? असा प्रश्न विचारला असता, हनी ट्रॅपमधे गिरीश महाजन आहे, असा माझा संशय असल्याचे खडसे यांनी म्हटले. तसेच, मुख्यमंत्र्याबाबत माझा राग नाही. नाशिकमधील व्यक्ती त्यांना माहिती आहे, हॉटेल देखील माहिती आहे. त्यामुळे त्यांनी याची चौकशी करा तात्काळ एसआयटी नेमा अशी माझी मागणी आहे, अशी मागणीही खडसेंनी केली आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List