62 वर्षांच्या शौर्याला सलाम! हवाई दल MIG-21 ला सन्मानाने देणार निरोप
हिंदुस्थानी हवाई दल येत्या 19 सप्टेंबरला सर्वात जुन्या आणि ऐतिहासिक लढाऊ विमान MiG-21 ला निरोप देणार आहे. चंदीगड एअरबेसवरील 23 स्क्वॉड्रन (पँथर्स) एका विशेष समारंभात या विमानाला निरोप देण्यात येणार आहे. 1963 मध्ये पहिल्यांदा सामील झालेले मिग-21 हे भारताचे पहिले सुपरसॉनिक जेट होते. याला वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे, त्याला ‘उडणारे शवपेटी’ असेही म्हटले जात असे. आता त्याच्या निवृत्तीमुळे, हवाई दलाची ताकद 29 स्क्वॉड्रनपर्यंत कमी होणार आहे.
मिग-21 हे सोव्हिएत युनियनने (आता रशियाने) बनवलेले लढाऊ विमान होते. 1963 मध्ये हिंदुस्थानी हवाई दलात समाविष्ट करण्यात आले. हे हिंदुस्थानचे पहिले सुपरसॉनिक जेट होते. त्याकाळी हे विमान हिंदुस्थानच्या हवाई शक्तीचे प्रतीक होते. 874 मिग-21 विमाने हवाई दलात समाविष्ट करण्यात आली होती, त्यापैकी सुमारे 600 विमाने हिंदुस्थानातच बनवण्यात आली होती. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) ने त्यांचे परवानाकृत उत्पादन केले.
मिग-21 ने अनेक मोठ्या युद्धांमध्ये भाग घेतला होता. यापैकी 1965 हिंदुस्थान -पाकिस्तान युद्ध: मिग-21 ने पहिल्यांदाच युद्धात भाग घेतला. पाकिस्तानी विमानांशी लढा दिला होता. 1971 मध्ये मिग-21 ने पूर्व पाकिस्तानच्या (आता बांगलादेश) स्वातंत्र्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी पाकिस्तानी लक्ष्यांवर अचूक हल्ले केले होते. कारगिल युद्धामध्ये रात्री उड्डाण करून मिग-21 ने शत्रूला नेस्तनाबूत केले होते. त्यावेळी वैमानिकांनी साध्या जीपीएस आणि स्टॉपवॉचच्या मदतीने हल्ले केले होते. 2019 मध्ये बालाकोट हल्लावेळी मिग-21 बायसनने पाकिस्तानी एफ-16 पाडले. ग्रुप कॅप्टन अभिनंदन वर्धमान यांनी मिग-21 उडवून हा पराक्रम केला होता. नुकत्याच झालेल्या ऑपरेशन सिंदूर अंतर्गत मिग-21 विमानांनी शेवटचा भाग घेतला होता.
मिग-21 कालबाह्य झाल्याने आता अखेर याला निवृत्त करण्यात येत आहे. मिग-21 चा एक उत्कृष्ट रेकॉर्ड होता, परंतु गेल्या काही दशकांमध्ये त्याच्या अपघातांमुळे त्याचे नाव खराब झाले. गेल्या 60 वर्षांत 400 हून अधिक मिग-21 विमाने कोसळली होती. यामध्ये 200 हून अधिक वैमानिकांनी आपले प्राण गमावले होते. म्हणूनच त्यानंतर मिग-21 ला ‘उडणारी शवपेटी’ म्हटले जात असे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List