अभिनेता श्रेयस तळपदेला सुप्रीम कोर्टाचा दिलासा, मल्टी लेव्हल मार्केटिंग गैरव्यवहार प्रकरणी अटक टळली
मल्टी लेव्हल मार्केटिंग गैरव्यवहार प्रकरणी अभिनेता श्रेयस तळपदे याला सुप्रीम कोर्टाने दिलासा दिला आहे. श्रेयस तळपदेची अटक टळली आहे. न्यायमूर्ती बी.व्ही नागरत्ना आणि न्यायमूर्ती के.व्ही. विश्वनाथ यांच्या खंडपीठासमोर श्रेयसने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी झाली. यावेळी याचिकेच्या अनुषंगाने हरियाणा पोलीस तसेच अन्य संबंधितांना उत्तर सादर करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले.
हरियाणातील एका सोसायटीने अभिनेता श्रेयस तळपदे आणि आलोकनाथ यांना ब्रँड अॅम्बेसिडर करत चिटफंड योजना सुरू केली होती. या चीटफंडच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना सहा वर्षात पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवत 45 गुंतवणूकदारांचे 9.12 कोटी रुपये सोसायटीने लाटले. पैसे लुटल्यानंतर सोसायटीची कार्यालये बंद करण्यात आली.
याप्रकरणी गुंतवणूकदारांनी तक्रार दाखल केल्यानंतर आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्यात श्रेयस तळपदे आणि आलोकनाथ यांना सहआरोपी करण्यात आले होते. यानंतर श्रेयस तळपदेने सुप्रीम कोर्टात धाव घेतली. ही सोसायटी सागा ग्रुपचा भाग असून 2018, 2019 आणि 2022 मध्ये या ग्रुपच्या कार्यक्रमांमध्ये पाहुणे सेलिब्रेटी म्हणून तळपदेला आमंत्रित करण्यात आले होते. आपला कंपनीशी कोणताही व्यावसायिक संबंध नसल्याचे श्रेयसने दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे.
श्रेयसविरोधात दाखल केलेले एअआयआर विशिष्ट आरोप किंवा पुराव्याशिवाय होते. त्याची भूमिका मर्यादीत होती आणि सोसायटीतील आर्थिक व्यवहारात त्याचा संबंध नव्हता, असा युक्तीवाद श्रेयदच्या वकिलांनी सुप्रीम कोर्टात केला. यावर सुप्रीम कोर्टाने सुनावणी करत श्रेयसला अटकेपासून दिलासा दिला आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List