शिवसैनिकांनी कोकाटेंच्या अंगावर पत्ते फेकले

शिवसैनिकांनी कोकाटेंच्या अंगावर पत्ते फेकले

अधिवेशनात जंगली रमी खेळल्याचा निषेध करीत शिवसैनिकांनी मंगळवारी नाशिकरोड येथे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अंगावर पत्ते फेकले. यावेळी पोलीस आणि अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांची पळापळ झाली.

नाशिकरोड भागातील दुर्गा गार्डन परिसरात सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार सरोज आहिरे यांनी छत्री वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता. येथे मंत्री माणिकराव कोकाटे आले. हे कळताच संतप्त शिवसैनिक तेथे पोहोचले. ‘शेतकर्‍यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून अधिवेशनात जंगली रमी खेळणारे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा धिक्कार असो’, ‘राजीनामा द्या, राजीनामा द्या, माणिकराव कोकाटे राजीनामा द्या’ अशी घोषणाबाजी करीत शिवसैनिकांनी कोकाटे यांच्या अंगावर पत्ते फेकले. या आंदोलनाने पोलीस व अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांची पळापळ झाली.

कृषीमंत्र्यांचा मतदारसंघ असलेल्या सिन्नरच्या पंचाळे येथील मी रहिवाशी आहे. शेतीपिकाचे मोठे नुकसान झाले असतानाही मंत्री तेथे फिरकले नाही, ते रमी खेळण्यात रमले असल्याने त्यांना पत्ते दिले, असे यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख अस्लम (भैया) मणियार यांनी सांगितले. त्यांच्यासह योगेश देशमुख, नीलेश शिरसाट यांना पोलिसांनी ताब्यात घेवून नंतर सोडून दिले.

 

Shiv Sainiks Hurl Cards at Minister Kokate in Nashik OverJungle RummyRow

Shiv Sena workers protested by throwing playing cards at Agriculture Minister Manikrao Kokate in Nashik, alleging he playedJungle Rummyduring assembly sessions. Police and NCP workers were caught off guard.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

आरोही, वैष्णवी, आराध्या, अवनी, शिप्रा, स्वरा यांची आगेकूच आरोही, वैष्णवी, आराध्या, अवनी, शिप्रा, स्वरा यांची आगेकूच
आरोही मोरे, वैष्णवी मांगलेकर, आराध्या ढेरे, अवनी शेट्टी, शिप्रा कदम, स्वरा मोरे यांनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून योनेक्स सनराईज...
गोरांक्ष, नैतिक, वेदांत, शाश्वत विजेते
Kalyan News – मराठी रिसेप्शनिस्ट तरुणीला बेदम मारहाण करणाऱ्या परप्रांतीय तरुणाला अटक
लहान मुलांना ‘हे’ 5 पदार्थ चुकूनही देऊ नका खायला, चवीच्या नादात आरोग्याचे होईल मोठे नुकसान
तुम्हीही गरजेपेक्षा जास्त बदाम खाता का? तर ‘या’ 5 मोठ्या समस्यांचा करा लागेल सामना
Thane News – कसारा स्थानकाजवळ दरड कोसळली, लोकल थोडक्यात बचावली; दोन प्रवासी गंभीर जखमी
Pune News – पत्नीचे अश्लील व्हिडिओ बनवत व्हायरल करण्याची धमकी; पैशासाठी क्लास वन अधिकाऱ्याचं संतापजनक कृत्य