माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घ्या; रत्नागिरीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची मागणी
कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचे बेजबाबदार वर्तन व शेतकऱ्यांना त्यांनी दिलेली असंवेदनशील वागणुकीचा निषेध करत रत्नागिरीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाच्या वतीने मंगळवारी कृषीमंत्री माणिक कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. हे निवेदन मंगळवारी जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष आणि माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर, शहराध्यक्ष निलेश भोसले, जिल्हा सरचिटणीस रणजित शिर्के, देवरुख तालुकाध्यक्ष बाबा साळवी, शहारध्यक्ष देवरुख निलेश भुवड, माजी नगरसेवक बबन आंबेकर, रत्नागिरी महिला कार्याध्यक्ष मुन्नवर मुल्ला, अल्पसंख्याक शहराध्यक्ष फर्झांना मस्तान, मनोहर गुरुव, अल्ताफ जेठी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List