घोळ घालू नका, अन्यथा समितीला काम करू देणार नाही – राज ठाकरे
5 जुलैच्या मोर्चाचा, या एकजुटीचा सरकारने धसका घेतला. ही भीती असली पाहिजे, असे नमूद करत हे उशिरा आलेलं शहाणपण नाही, कारण ही सक्ती फक्त आणि फक्त मराठी जनतेच्या रेटय़ामुळे मागे घेतली गेली. हिंदी भाषेसाठी इतका अट्टाहास का होता आणि यासाठी सरकारवर नक्की कुठून दबाव होता, हे गूढच आहे, अशी एक्स पोस्ट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली. हा निर्णय कायमचा रद्द झाला आहे असं आम्ही आणि महाराष्ट्रातील जनतेने गृहीत धरले आहे. त्यामुळे आता समितीच्या अहवालाचा घोळ घालू नका, अन्यथा या समितीला महाराष्ट्रात काम करू दिलं जाणार नाही, असा इशारा राज यांनी दिला.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List