शेफालीने उपाशी पोटी घेतले अँटी एजिंगचे इंजेक्शन, त्यामुळे रक्तदाब कमी झाल्याची पोलिसांची माहिती

शेफालीने उपाशी पोटी घेतले अँटी एजिंगचे इंजेक्शन, त्यामुळे रक्तदाब कमी झाल्याची पोलिसांची माहिती

काँटा लगा फेम शेफाली जरीवालाचे कार्डियेक अरेस्टने अवघ्या 42 व्या वर्षी निधन झाले आहे. ज्या दिवशी शेफालीचा मृत्यू झाला त्या दिवशी शेफालीने उपवास धरला होता. तसेच नेहमीची अँटी एजिंग औषधं घेतली होती त्यामुळे तिचा रक्तदाब कमी झाला होता अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

इंडियन एक्सप्रेसने याबाबत वृत्त दिले आहे. पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी रात्री शेफालीने आपल्या नेहमीच्या गोळ्या घेतल्या. तिने अँटी एजिंग म्हणजेच वय कमी दिसावे म्हणून एका औषधाचे इंजेक्शनही घेतले होते. ही औषधं गेली अनेक वर्षांपासून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घेत होती. ही औषधं घेतल्यानंतर शेफालीचा रक्तदाब कमालीचा कमी झाला. तिची तब्येत खालावल्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आली.

पोलिसांसह फॉरेन्सिक टीमने तिच्या घरची झडती घेतली आणि शेफाली जी जी औषधं सेवन करत होती त्याचे नमुने ताब्यात घेतले आहेत. ज्या दिवशी शेफालीचे निधन झाले त्या दिवशी शेफालीने उपवास धरला होता. तिच्या घरी सत्यनारायणाची पूजा होती, त्यामुळे तिने उपवास धरला होता. उपाशी पोटी शेफालीने औषधं घेतली आणि तिची तब्येत खालावल्याचे सांगितले जात आहे. असे असले तरी पोलीस अजून कुठल्याही निष्कर्षापर्यंत पोहोचलेले नाहीयेत. पोलीस प्रशासन डॉक्टरांनी घेतलेल्या चाचणीच्या निकालाची वाट पाहत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;