दिल्लीत 15 वर्षे जुन्या वाहनांना नो पेट्रोल
दिल्लीतील प्रदूषण कमी करण्यासाठी सरकार 1 जुलैपासून नवीन नियम आणणार आहे. या नियमाअंतर्गत दिल्लीत 15 वर्षांहून अधिक जुन्या पेट्रोल वाहनांना पेट्रोल तर 10 वर्षांहून अधिक जुन्या डिझेल वाहनांना डिझेल मिळणार नाही. या नियमाची अंमलबजावणी येत्या 1 जुलै 2025 पासून केली जाणार आहे. दिल्ली सरकारने हा नियम लागू करण्यासाठी स्टँडर्ड ऑपरेटिंग सिस्टिमला अधिकृतपणे जारी केले आहे. जुन्या वाहनांना दिल्लीतील कोणत्याही पेट्रोल पंपावर इंधन मिळणार नाही. या वाहनांची ओळख पटवण्यासाठी सर्व पेट्रोल पंपावर ऑटोमेटेड नंबर प्लेट रिकग्नेशन सिस्टम लागू केली जाणार आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List