पतंजलीच्या जगातील सर्वात मोठ्या आयुर्वेदिक टेलिमेडिसिन सेंटरचे उद्घाटन

पतंजलीच्या जगातील सर्वात मोठ्या आयुर्वेदिक टेलिमेडिसिन सेंटरचे उद्घाटन

पतंजलीने आज जागतिक आयुर्वेदाच्या क्षेत्रात मोठी झेप घेतली आहे. पतंजलीने ऐतिहासिक पाऊल उचलत जगातील सर्वात मोठ्या आयुर्वेदिक टेलिमेडिसिन प्लॅटफॉर्मचे उद्घाटन केले आहे. या आयुर्वेदिक टेलिमेडिसिन सेंटरचे औपचारिक उद्घाटन स्वामी रामदेव आणि आचार्य बालकृष्ण यांच्या हस्ते यज्ञ आणि वैदिक मंत्राच्या जयघोषात केले आहे.

या प्रसंगी स्वामी रामदेव यांनी हे टेलिमेडिसिन सेंटर हरिद्वार ते हर द्वारपर्यंत पोहचणार असल्याचे म्हटले आहे. हे टेलीमेडिसिन केंद्र भारताच्या ऋषीमुनींपासून चालत आलेल्या परंपरेचे ज्ञान प्रत्येक घरात पोहचवण्याचा एक दिव्य साधन बनणार आहे. या सर्व आरोग्याच्या सेवा ऑनलाइन उपलब्ध होणार आहेत.ज्या लाभ कोट्यवधी लोकांना जगभर होणार आहे. पतंजलीचे टेलीमेडिसिन सेंटर मानव सेवेसाठी उत्कृष्ट पाऊल ठरणार आहे.

उद्घाटन समारंभात आचार्य बाळकृष्ण म्हणाले की ज्याप्रमाणे संपूर्ण जग योगासाठी भारताकडे पाहत आहे, त्याचप्रमाणे जग आता आयुर्वेद आणि त्याच्या उपचारासाठी आशेने भारताकडे पाहत आहे. हे टेलिमेडिसिन सेंटर त्या दिशेने एक उत्तम पाऊल ठरणार आहे. आचार्य बाळकृष्ण यावेळी म्हणाले की पतंजली टेलिमेडिसिन सेंटर हे एक पूर्णपणे विकसित आणि सर्वोत्तम मॉडेल ठरणार आहे.

मुख्य वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे –

* मोफत ऑनलाइन आयुर्वेदिक सल्लामसलत

* पतंजलीच्या उच्च प्रशिक्षित डॉक्टरांची टीम

* प्राचीन शास्त्रांमध्ये रुजलेली वैयक्तिकृत हर्बल प्रिस्क्रिप्शन

* डिजिटल आरोग्य नोंदी आणि पद्धतशीर फॉलो-अप

* व्हॉट्सअॅप, फोन आणि वेब-आधारित प्लॅटफॉर्मद्वारे सहज उपलब्धता

हा उपक्रम प्रत्येक घरात प्रामाणिक, शास्त्र-आधारित आयुर्वेदिक आरोग्य उपचाराचा आधार बनेल. विशेषतः दुर्गम भागात आणि परदेशात राहणाऱ्यांना याचा विशेष फायदा होईल, जे केंद्राला भेट देऊ शकत नाहीत त्यांच्यासाठी हा उपक्रम वरदान ठरणार आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

महायुती सरकार भिकारी! माणिकरावांच्या वक्तव्याने पुन्हा नवा वाद; बळीराजा भडकला… राज्यात ठिकठिकाणी उग्र आंदोलन महायुती सरकार भिकारी! माणिकरावांच्या वक्तव्याने पुन्हा नवा वाद; बळीराजा भडकला… राज्यात ठिकठिकाणी उग्र आंदोलन
विधिमंडळ अधिवेशनात ऑनलाईन ‘जंगली रमी’ गेम खेळण्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने कृषीमंत्री माणिकराव कोकाटे चांगलेच अडचणीत आले आहेत. त्यातच पीक विम्यासाठी...
वाढदिवसानिमित्त देवाभाऊंवर कौतुकवर्षाव; संधी आहे, फडणवीस दिल्लीत जातील, उद्धव ठाकरे, पवार यांच्याकडून शुभेच्छा!
आईच्या नावाने बार काढता, बायका नाचवता, लाज वाटत नाही काय? अनिल परब यांचा जोरदार हल्ला
गणेश मंडपासाठी रस्त्यावर खड्डा पाडल्यास 15 हजार दंड, पालिकेच्या नियमांचे विघ्न
‘अविश्वासा’मुळेच धनखड यांचा राजीनामा, एक कॉल आला आणि तडकाफडकी निर्णय, न्या. वर्मा यांच्याविरुद्धच्या ठरावाने ठिणगी पडली
संतापजनक घटना… पोटात लाथा घातल्या, केस पकडून उचलून आपटले; कल्याणमध्ये मराठी स्वागतिकेला परप्रांतीय तरुणाकडून अमानुष मारहाण
साखळी बॉम्बस्फोट; राज्य सरकार सुप्रीम कोर्टात, आरोपींच्या सुटकेला आव्हान