Vasai News – वसईतील समुद्रकिनाऱ्यावर संशयास्पद कंटेनर, पोलिसांकडून तपास सुरू
वसईतील कळंब समुद्रकिनाऱ्यावर मंगळवारी संशयित कंटनेर आढळल्याने एकच खळबळ उडाली. कंटेनर पाहून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. स्थानिकांनी तात्काळ नालासोपारा पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत पुढील तपास सुरू केला. पोलीस आणि तटरक्षक दलाने कळंब समुद्रकिनाऱ्याजवळील सुरक्षा वाढवली आहे.
मंगळवारी सकाळी मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या नागरिकांनी समुद्रात संशयास्पद मोठा कंटनेर समुद्रात वाहून येताना पाहिला. यानंतर समुद्रकिनाऱ्यावर गोंधळ उडाला. बघ्यांची एकच गर्दी जमली. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि तटरक्षक दल घटनास्थळी दाखल झाले. सुरक्षेच्या दृष्टीने नागरिकांना कंटेनरजवळ न जाण्याचे आवाहन केले आहे. नागरिकांनी संयम बाळगण्याचे आणि अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List