आईच्या नावाने बार काढता, बायका नाचवता, लाज वाटत नाही काय? अनिल परब यांचा जोरदार हल्ला

आईच्या नावाने बार काढता, बायका नाचवता, लाज वाटत नाही काय? अनिल परब यांचा जोरदार हल्ला

गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईच्या नावे असलेल्या सावली बारमधून बारबाला आणि गिऱहाईके पकडली गेल्याचे सांगत शिवसेना नेते-आमदार अॅड. अनिल परब यांनी खळबळ उडवून दिली होती. आज त्यांनी दुसरा धमाका केला. योगेश कदम यांच्या काळय़ा कारनाम्यांचे पुरावे आणि पेन ड्राइव्ह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्या देणार असल्याचे परब यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांनी पुरावे पहावेत आणि कारवाई करून योगेश कदम यांचा तातडीने राजीनामा घ्यावा, नाहीतर आपण कोर्टात जाऊ, असा इशाराही अनिल परब यांनी दिला.

अनिल परब यांनी आज वांद्रे येथे पत्रकार परिषद घेऊन योगेश कदम यांच्या घोटाळय़ाचे पुरावेच प्रसारमाध्यमांसमोर ठेवले. गृह राज्यमंत्री असलेले योगेश कदम स्वतःच्या आईच्या नावाने असलेल्या त्या डान्सबारमध्ये पोरी नाचवून अश्लीलता पसरवत आहेत. योगेश कदमांविरुद्धचे पुरावे आजच मुख्यमंत्री फडणवीस यांना देणार होतो, पण ते मुंबईत नसल्याने उद्या त्यांची भेट घेऊन ते पुरावे देईन. त्यावर कारवाई करेपर्यंत दर महिन्याला मुख्यमंत्र्यांना स्मरणपत्र देणार, असे अनिल परब यांनी सांगितले.

सावली बार आपल्या पत्नीच्याच नावे असल्याचे रामदास कदम यांनी कबूल केल्याने आता बारच्या मालकीबद्दल संभ्रम राहिलेला नाही, असे सांगत अनिल परब यांनी रामदास कदम यांनाही लक्ष्य केले.

बेकायदा वाळू उपसून बहिणीच्या कॉलेजसाठी वापरली

जगबुडी नदीतील वाळूमिश्रित गाळ काढला जातो. त्यातील वाळू नंतर वेगळी केली जाते. ती वाळू कुणीही नेत नाही असे योगेश कदम सांगतात मग ती वाळू त्यांच्या बहिणीच्या कॉलेजमध्ये कशी पोहोचली. या सगळय़ांचे जिओ टॅगिंग केले आहे, फोटोही आहेत, तो पेनड्राईव्ह मुख्यमंत्र्यांना देणार आहे. म्हाप्रळ महादेव नाल्यातील गाळ काढायची परवानगी असताना सावित्री नदीचा गाळ काढला गेला. नंतर तिथे गाळ काढण्यावर बंदी घातली. हे गाळ उपसण्याचे काम कदमांच्या घरात काम करणारा अकील मुकादम हा करतो, असेही परब यांनी सांगितले.

सावली बारची माहिती आरटीआयमधून मिळाली

सावली बार आणि तिथे घडलेल्या अनैतिक कृत्याबद्दलची माहिती आपल्याला माहिती अधिकारातच मिळाली असल्याने ती खोटी असू शकत नाही. ती विधिमंडळात मांडल्यानंतर कदम यांनी माझा उल्लेख अर्धवट वकील म्हणून केला. पण विधानसभेत मी आमदार म्हणून बोलतो. माझी चौथी टर्म आहे. त्यामुळे मला विधानसभेचे नियम आणि कायदे चांगले माहिती आहेत. मला त्यांच्या सर्टिफिकेटची गरज नाही, असे अनिल परब यांनी सुनावले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

सलमान खानच्या बाल्कनीला बुलेटप्रुफ काच का लावली? भाईजानने सांगितलं त्यामागचं कारण सलमान खानच्या बाल्कनीला बुलेटप्रुफ काच का लावली? भाईजानने सांगितलं त्यामागचं कारण
बाॅलिवूडमध्ये सलमान खानची भाईजान म्हणून ओळख सर्वज्ञात आहे. आतापर्यंत सलमानने अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत आणि प्रेक्षकांच्या हृदयात एक खास...
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या याचिकेच्या सुनावणीत सरन्यायाधीश सहभागी होणार नाही; काय म्हणाले भूषण गवई…
आता माझी वेळ आलीय, हेलिकॉप्टर पाठवा आणि वचन पूर्ण करा; भाजप खासदाराला खडे बोल सुनावणारी गर्भवती महिला पुन्हा चर्चेत
हनी ट्रॅपमध्ये अडकलेल्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच वाचवताहेत, संजय राऊत यांचा गंभीर आरोप
केंद्रीय निवडणूक आयोगाकडून उपराष्ट्रपती निवडणुकीची प्रक्रिया सुरू; लवकरच तारखा जाहीर होण्याची शक्यता
हिंदुस्थान सरकारचा मोठा निर्णय, चिनी नागरिकांना आता व्हिसा मिळणार
Emiway Bantai Injured- बॉलिवूडच्या प्रसिद्ध रॅपरचा भीषण कार अपघात? व्हिडीओ व्हायरल