Thane News – कसारा स्थानकाजवळ दरड कोसळली, लोकल थोडक्यात बचावली; दोन प्रवासी गंभीर जखमी

Thane News – कसारा स्थानकाजवळ दरड कोसळली, लोकल थोडक्यात बचावली; दोन प्रवासी गंभीर जखमी

मुंबईहून कसाऱ्याला जाणाऱ्या लोकलवर दरड कोसळल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. कसारा स्थानकाजवळ ट्रॅक बदलत असताना शेजारच्या टेकडीवरील दरड कोसळली. या दुर्घटनेत दोन प्रवाशी गंभीर जखमी झाले आहेत. मोटरमनने सावधगिरी बाळगत लोकल कसारा स्थानकात आणली.

सीएसएमटी-कसारा लोकल रात्री 9 वाजण्याच्या दरम्यान कसारा रेल्वे स्थानकात येत होती. यावेळी प्लॅटफॉर्मसाठी ट्रॅक बदलत असतानाच ट्रॅक लागत असलेल्या उंच टेकडीवरील दरड अचानक कोसळली. सदर दरड ही थेट लोकलवर कोसळली. यात दरवाज्यात उभ्या असलेल्या दोन प्रवाशांना गंभीर दुखापत झाली आहे.

बाळू जाधव असे एका प्रवाशाचे नाव आहे. या दरडीमुळे लोकललाही काही प्रमाणात धक्का बसला. दरडीमुळे गंभीर दुखापत झालेल्या जखमींना आपत्ती व्यवस्थापन टीम कसाराचे सदस्य प्रमोद वारंगुसे यांनी लोकलमधील अन्य प्रवाशांच्या मदतीने कसारा रेल्वे स्थानकात उतरवले. रेल्वे पोलिसांना तात्काळ घटनेची माहिती देण्यात आली. आरपीएफने आपत्ती व्यवस्थापन टीमच्या सदस्यांच्या मदतीने जखमींना कसारा प्राथमिक आरोग्य केंद्र उपचारासाठी दाखल केले .

दरम्यान यावेळी रेल्वे स्थानकावर आवश्यक असलेले आपत्कालीन साहित्य उपलब्ध नव्हते. तसेच जीआरपीची मदत मिळाली नाही. सदर घटनेची माहिती रेल्वेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षाला मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी रेल्वे ट्रॅकवर आलेले दरड दगड बाजूला केले. यानंतर 9 वाजून 21 मिनिटांनी लोकल कसाऱ्याहून मुंबईकडे 15 मिनिटे उशिराने रवाना केली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

अहिल्यानगर महापालिकेतील 400 कोटींचा घोटाळा उघडकीस आणल्यामुळे सुडाने कारवाई, किरण काळे यांच्यावर खोटा गुन्हा अहिल्यानगर महापालिकेतील 400 कोटींचा घोटाळा उघडकीस आणल्यामुळे सुडाने कारवाई, किरण काळे यांच्यावर खोटा गुन्हा
अहिल्यानगर महापालिकेतील रस्त्यांच्या कामातील 400 कोटींचा घोटाळा उघडकीस आणून भ्रष्ट अधिकारी आणि स्थानिक राजकारण्यांचा पर्दाफाश शिवसेना शहरप्रमुख किरण काळे यांनी...
बिहार विधानसभेत राडा; विरोधक, मार्शल्समध्ये धक्काबुक्की
शिवसैनिकांनी कोकाटेंच्या अंगावर पत्ते फेकले
सुरतमध्ये 28 किलो सोन्याची पेस्ट पकडली
गटारी नव्हे, ही तर दीप अमावस्या…जाणून घ्या महत्त्व…
Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 23 जुलै 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस
महायुती सरकार भिकारी! माणिकरावांच्या वक्तव्याने पुन्हा नवा वाद; बळीराजा भडकला… राज्यात ठिकठिकाणी उग्र आंदोलन