Kalyan News – मराठी रिसेप्शनिस्ट तरुणीला बेदम मारहाण करणाऱ्या परप्रांतीय तरुणाला अटक
कल्याणमध्ये एका खासगी रुग्णालयातील रिसेप्शनिस्ट मुलीवर जीवघेणा हल्ला करून पसार झालेला आरोपी गोकुळ झा याला अटक करण्यात आली आहे. गोकुळला मंगळवारी रात्री 10 च्या सुमारास कल्याणच्या नेवाळीनाका परिसरातून नागरिकांच्या मदतीने अटक करण्यात मानपाडा पोलिसांना यश आल्याची माहिती कल्याण पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी दिली आहे.
दरम्यान, नांदिवलीतील एका खासगी रुग्णालयात पीडित तरुणी ही रिसेप्शनिस्ट म्हणून काम करते. गोपाल झा हा परप्रांतीय तरुण डॉक्टरांना भेटायला आला होता. यावेळी डॉक्टरांच्या केबिनमध्ये आधीच एमआर बसले होते. त्यामुळे डॉक्टरकडे एमआर बसले आहेत, तुम्ही जरा थांबा असे तरुणी आरोपीला बोलली. यानंतर गोपालने तिच्याशी वाद घालायला सुरवात केली. यानंतर तरुणीच्या अंगावर धावून येत तिला लाथ मारली. यामुळे तरुणी खाली पडली. आरोपीने तिचे बखोट पकडलं आणि केसांना धरून तिला फरफटत नेत लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली होती. याप्रकरणी मानपाडा पोलिसात नोंद करण्यात आली होती. यानंतर आता आरोपीला अटक करण्यात आली आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List