राज्यपाल म्हणतात, मारहाण केल्याने मराठी बोलता येईल का?

राज्यपाल म्हणतात, मारहाण केल्याने मराठी बोलता येईल का?

मराठी बोलता येत नाही म्हणून मारहाण केली तर मराठी बोलता येईल का, असा सवाल राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी आज केला. राज्यपाल राधाकृष्णन यांच्या हस्ते आज ‘महाराष्ट्र नायक’ या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन झाले. यावेळी बोलताना त्यांनी भाषेवरून वाद का घालायचा, असा प्रश्न उपस्थित करीत आपली भूमिका स्पष्ट केली. महाराष्ट्रात मराठी बोलले नाही तर तुम्हाला मार खावा लागेल, असे वर्तमानपत्रांतून सध्या वाचायला मिळत आहे. मी खासदार असताना तामीळनाडूतही भाषेचा असाच वाद उभा राहिला होता. तमीळ भाषा बोलता येत नसलेल्यांना काही लोक मारत होते. मात्र आता मला मराठी येत नाही म्हणून कुणी मारहाण केली तर मला लगेच घडाघडा मराठी बोलता येईल का? भाषेच्या नावावर दहशत पसरवली जात असेल तर मग महाराष्ट्रात गुंतवणूकदार येतील का? असा सवालही राज्यपालांनी केला. त्यांनी जनतेला भाषेच्या मुद्दय़ावर सहिष्णू धोरण बाळगण्याचेही आवाहन केले. कार्यकमात मंत्री गिरीश महाजन बोलत असताना मला ती भाषा येत नसल्याने त्यांच्या चेहऱयाकडे बघून ते काय बोलत असतील याचा अंदाज घेत होतो, असेही त्यांनी सांगितले. आपण अनेक भाषा शिकल्या पाहिजेत, मात्र आपण आपल्या मातृभाषेचा अभिमानही बाळगला पाहिजे. त्यात कोणतीही तडजोड करता कामा नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

सलमान खानच्या बाल्कनीला बुलेटप्रुफ काच का लावली? भाईजानने सांगितलं त्यामागचं कारण सलमान खानच्या बाल्कनीला बुलेटप्रुफ काच का लावली? भाईजानने सांगितलं त्यामागचं कारण
बाॅलिवूडमध्ये सलमान खानची भाईजान म्हणून ओळख सर्वज्ञात आहे. आतापर्यंत सलमानने अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत आणि प्रेक्षकांच्या हृदयात एक खास...
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या याचिकेच्या सुनावणीत सरन्यायाधीश सहभागी होणार नाही; काय म्हणाले भूषण गवई…
आता माझी वेळ आलीय, हेलिकॉप्टर पाठवा आणि वचन पूर्ण करा; भाजप खासदाराला खडे बोल सुनावणारी गर्भवती महिला पुन्हा चर्चेत
हनी ट्रॅपमध्ये अडकलेल्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच वाचवताहेत, संजय राऊत यांचा गंभीर आरोप
केंद्रीय निवडणूक आयोगाकडून उपराष्ट्रपती निवडणुकीची प्रक्रिया सुरू; लवकरच तारखा जाहीर होण्याची शक्यता
हिंदुस्थान सरकारचा मोठा निर्णय, चिनी नागरिकांना आता व्हिसा मिळणार
Emiway Bantai Injured- बॉलिवूडच्या प्रसिद्ध रॅपरचा भीषण कार अपघात? व्हिडीओ व्हायरल