हा आजार झाला की मृत्यू अटळ, तडफडून जातो जीव; वेळीच घ्या काळजी अन्यथा…
नुकतेच ब्रिजेश सोळंकी नावाच्या 22 वर्षीय कबड्डीपटूचा रेबीजने मृत्यू झाला आहे. रस्त्यावरील कुत्र्याच्या पिल्लाला त्याने वाचवलं होतं. तोच कुत्रा चावल्याने त्याला रेबीजची लागण झाली होती. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)
रेबीज हा एक घातक असा विषाणूंमुळे होणारा आजार आहे. प्राण्याने चावा घेतल्यानंतर किंवा प्राण्याच्या लाळेशी संपर्क आल्यास रेबीज आजाराची लागण होते. कुत्रा, मांजर, माकड तसेच अन्य जंगली प्राण्यांनी चावा घेतल्यास हा आजार होतो. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)
रेबीज विषाणूची लागण झाल्यास तो थेट मेंदूवर हल्ला करतो. या आजाराची लक्षणं काही आठवडे ते काही महिन्यांत दिसतात. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)
या आजाराची लागण झाली तर ताप, डोकेदुखी, थकवा, चावा घेतलेल्या जागेवर खाज येणे आग होणे, घशात खाज येणे, मळमळ, उलटी अशी सुरुवातीला लक्षणं दिसतात. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)
रेबीजच्या विषाणूने न्यूरॉन्सवर हल्ला करण्यास चालू केल्यानंतर अस्वस्थता, हॅल्यूसिनेशन्स, हायड्रोफोबिया, लाळ गळणे, अन्न गिळायला अडचण येणे, आक्रमकता, कोमामध्ये जाणे, पॅरालिसीस अशा प्रकारची लक्षणं दिसून येतात. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List