मराठी हिंदी वाद निर्माण करण्यासाठीच निशिकांत दुबेंचे वक्तव्य; हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप

मराठी हिंदी वाद निर्माण करण्यासाठीच निशिकांत दुबेंचे वक्तव्य; हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप

भाजपा खासदार निशिकांत दुबे यांनी मराठी हिंदी वादावर केलेले विधान अत्यंत आक्षेपार्ह व निषेधार्ह आहे. दुबेंच्या वक्तव्यावरून भारतीय जनता पक्षाला मराठी हिंदी वाद निर्माण करून वाढवायचा आहे हे स्पष्ट दिसत आहे. मराठी हिंदी हा भाषिक वाद निर्माण करून त्याला भारत पाकिस्तान वादासारखा शत्रुत्वाचा रंग देण्याचा हा प्रयत्न देशभरातील भाजप नेत्यांकडून सुरु आहे. भाषिक आणि प्रांतिक वाद निर्माण करण्याचा हाच अजेंडा भाजप निशिकांत दुबेंच्या तोंडून पुढे रेटत आहे, असा घणाघाती हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.

हिंदी, हिंदुत्व व हिंदू राष्ट्र ही ज्यांची संकल्पना आहे तेच लोक पहिलीपासून हिंदी सक्ती करण्याच्या पाठीमागे आहेत. या मानसिकतेचे लोकच बहुजनांच्या ज्ञानाची मराठी भाषा व तिचा संघर्ष गिळू पहात आहेत. हा जुनाच संघर्ष असून हिंदीच्या निमित्ताने तो पुन्हा चव्हाट्यावर आणला आहे. हिंदी सक्तीच्या फतव्यामागे रेशिमबाग असल्याने त्याची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न फडणवीस सरकार करत आहे, असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

शालेय शिक्षण अभ्यास आणि कृती समन्वय समितीने हिंदी सक्ती विरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन केले, या आंदोलनात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी झाले होते. यावेळी बोलताना सपकाळ पुढे म्हणाले की, मराठी ही बंडखोर भाषा आहे. ज्ञान फक्त मोजक्याच लोकांना मिळाले पाहिजे व ते इतरांना मिळता कामा नये व तसा कोणी प्रयत्न केला तर त्याला शिक्षा केली जात असे. पण त्याला वेळोवेळी आव्हान दिले गेले, त्याविरोधात बंड केले गेले. मराठी ज्ञान भाषा होता कामा नये अशा एक वर्ग होता तोच वर्ग हिंदी सक्तीच्या नावाने जुनीच लढाई लढण्याच्या तयारीत आहे. त्यांनी आज हिंदी सक्तीचा दगड मारून पाहिला आहे. पण लोकांचा तीव्र विरोध पाहून दोन्ही शासन आदेश रद्द केले आहेत, असे असले तरी ही लढाई संपलेली नाही. सरकारने डॉ. नरेंद्र जाधव समिती नेमलेली आहे. जाधव हे रबर स्टॅम्प असून ते भाषा तज्ञ नाहीत. सरकारला जे हवे तेच ते नरेंद्र जाधवांकडून करून घेतील. त्यामुळे गाफील राहून चालणार नाही, असे सपकाळ म्हणाले.

आपला लढा दोन जीआर रद्द करण्यापुरता नाही तर महाराष्ट्र धर्म वाचवण्याचा असून आगामी काळात एक कृती आराखडा तयार करून जिल्ह्या-जिल्ह्यात जाऊन जागृती करावी लागेल, असेही ते म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;