एकत्र आलोय एकत्र राहणार! माय मराठीसाठी उभे ठाकले ठाकरे

एकत्र आलोय एकत्र राहणार! माय मराठीसाठी उभे ठाकले ठाकरे

वरळीचे एनएससीआय डोम तुडुंब भरले, बाहेरही हजारोंची गर्दी, अद्भुत आणि अफलातून विजयी मेळावा… मराठी माणसासाठी सुवर्णक्षण, महाराष्ट्र आणि मराठीसाठी एकत्र लढ्याचे ऐलान… आता थांबायचं नाय..मराठी प्रेमाचा डोम गगनाला भिडला.

ठाकरे आले…त्यांना पाहिले, डोळे पाणावले, मन सुखावले!
माय मराठीसाठी ठाकरे उभे ठाकले आणि आज अवघ्या महाराष्ट्रात आनंदी आनंद झाला. माय मराठीच्या विजयाचा ऐतिहासिक सोहळा वरळीच्या एनएससीआय डोममध्ये झाला. सभागृह गर्दीने तुडुंब भरले होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे दोघे बंधू व्यासपीठावर एकत्र आले आणि मराठीप्रेमाचा डोम जणू गगनाला भिडला. याच गर्दीच्या साक्षीने ठाकरे बंधूंनी आता थांबायचे नाही असा हुंकार देत महाराष्ट्र आणि मराठीसाठी एकत्र लढ्याचे ऐलान केले. महाराष्ट्राला भावुक करणारा हा क्षण होता. ठाकरे बंधूंना एकत्र पाहून लाखो डोळे आनंदाश्रूंनी पाणावले. कित्येक दिवसांपासून मनात असलेली इच्छा पूर्ण झालेली पाहून अवघे मराठी मन सुखावले.

ठाकरे बंधू एकत्र आल्याचा सुवर्णक्षण डोळय़ात साठवण्यासाठी सगळेच आतुर झाले होते. दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास विजयोत्सव सुरू झाला. निवेदकांनी उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांच्या आगमनाची वर्दी दिली. हे दोन्ही बंधू व्यासपीठावर येत असताना संपूर्ण सभागृहात अंधार करण्यात आला. मात्र हा क्षण पाहण्यासाठी अधीर झालेल्या लोकांनी आपल्या मोबाईलचे टॉर्च सुरू केले. अधीरता वाढत असतानाच सभागृह पुन्हा दिव्याच्या प्रकाशाने उजळले आणि साक्षात ठाकरे बंधू व्यासपीठाच्या दोन्ही बाजूंकडून समोर येताना दिसले. दोघांनीही जमलेल्या जनसागराला हात उंचावून, नमस्कार करून अभिवादन केले.

टाळ्यांचा कडकडाट… घोषणांचा गडगडाट
उद्धव ठाकरे यांनी राज यांच्या खांद्यावर हात टाकला आणि उपस्थितांनी एकच जल्लोष केला. अवघे वातावरण भारून गेले. सारे काही डोळ्यांसमोर घडत असतानाही हा क्षण मोबाईलच्या पॅमेऱ्यात टिपण्याचा मोह लोकांना आवरत नव्हता. ठाकरे बंधू व्यासपीठावर स्थानापन्न होईपर्यंत टाळ्यांचा कडकडाट अखंड सुरू होता. घोषणा दिल्या जात होत्या. सभागृहाच्या बाहेरही तोच माहौल होता. घोषणांनी अवघा आसमंत दणाणून गेला होता.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

उपचारादरम्यान वाघाचा प्राणीरक्षकावर हल्ला उपचारादरम्यान वाघाचा प्राणीरक्षकावर हल्ला
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील वैद्यकीय पिंजऱ्यामध्ये उपचार करतेवेळी टी-5 या वाघाने प्राणीरक्षकावर हल्ला केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्या रक्षकाने...
राजा रघुवंशी हत्या प्रकरणात दोघांना जामीन मंजूर, शिलाँग कोर्टाचा निर्णय
Pune News – बारामती पालखी महामार्गावर कार आणि दुचाकीचा भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू
IND vs ENG 3rd Test – टीम इंडियाची घोडदौड 387 धावांवर थांबली, तिसऱ्या दिवसाचा खेळ समाप्त; इंग्लंडने घेतली आघाडी
Baloch Army Attack – बलूच सैन्याच्या हल्ल्यात 50 पाकिस्तानी सैनिक ठार, बीएलएफचा दावा
Jammu Kashmir – एसयूव्ही कार 600 फूट दरीत कोसळली, 5 जणांचा मृत्यू; एक गंभीर जखमी
Ratnagiri News – पळवून लावलं तरी बिबट्या गुरांच्या गोठ्यातच येऊन बसायचा, अखेर वनविभागाने केले जेरबंद