याला म्हणतात न्यायव्यवस्था… थायलंड कोर्टाने पंतप्रधानांनाच हटवले! निकालाचे जगभरातून कौतुक
थायलंडच्या संविधानिक न्यायालयाने आज ऐतिहासिक निकाल दिला. एका फोन कॉल लीक प्रकरणाची गंभीर दखल घेत केवळ नैतिकतेच्या आधारे न्यायालयाने थेट देशाच्या पंतप्रधान पेटोंगटार्न शिनवात्रा यांना पदावरून हटवले. या धाडसी व निष्पक्ष निर्णयाचे थायलंडसह जगभरातून भरभरून कौतुक होत असून ‘याला म्हणतात न्यायव्यवस्था’ अशी भावना व्यक्त होत आहे.
थायलंड व पंबोडियामधील सीमावादावर सध्या चर्चा सुरू आहे. थायलंडच्या पंतप्रधान शिनवात्रा व पंबोडियाचे नेते हुन सेन हेदेखील चर्चेचा भाग होते. त्यांच्यात फोनवरून झालेल्या संभाषणाचा एक ऑडिओ लीक झाला. त्यामुळे शिनवात्रा संशयाच्या भोवऱ्यात सापडल्या व त्यांच्या विरोधात तक्रारी केल्या गेल्या. निदर्शनेही सुरू झाली. नैतिकतेचे उल्लंघन केल्याचा खटला शिनवात्रा यांच्या विरोधात दाखल झाला. त्याचा निकाल आज आला. या प्रकरणाची चौकशी सध्या सुरू आहे. ती पूर्ण होईपर्यंत शिनवात्रा यांना पदावरून दूर होण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
लीक झालेल्या ऑडिओमध्ये काय?
ज्या ऑडिओ कॉलमुळे शिनवात्रा संशयाच्या भोवऱ्यात अडकल्या, तो कॉल शिनवात्रा व पंबोडियाचे नेते हुन सेन यांच्यातील आहे. या चर्चेत त्या सेन यांना ‘अंकल’ म्हणत होत्या. तसेच, सेन यांची काही मागणी असेल तर त्यावर विचार केला जाईल, असे त्या म्हणाल्या होत्या. हा कॉल लीक झाल्यानंतर थायलंडच्या राजधानीत हजारो लोक रस्त्यावर उतरले व शिनवात्रा यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List