शिवसेना व मनसेच्या नेत्यांनी वरळीतील एनएससीआय डोमची केली एकत्रित केली पाहणी
महायुती सरकारने हिंदी सक्ती उठवल्याचा जल्लोष साजरा करण्यासाठी शिवसेना व मनसेकडून वरळीतील एनएससीआय डोममध्ये विजयोत्सव साजरा केला जाणार आहे. या विजयोत्सवासाठी वाजतगाजत, गुलाल उधळत या… आम्ही वाट बघतोय… असे निमंत्रण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एकत्रितरित्या सर्व मराठीजनांना दिले आहे.
या कार्यक्रमाच्या तयारीसाठी बुधवारी शिवसेना व मनसेच्या नेत्यांनी एनएससीआय डोमची पाहणी केली. यावेळी शिवसेनेकडून विधानपरिषद आमदार अनिल परब आणि मनसे नेते बाळा नांदगावकर व नितीन सरदेसाई यांनी डोमची पाहणी केली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List