अखेर गायब झालेले  पालकमंत्री अवतरले…!

अखेर गायब झालेले   पालकमंत्री अवतरले…!

कुंडमळा येथील पूल कोसळण्याची दुर्घटना घडल्यानंतर गायब असलेले पालकमंत्री अजित पवार अखेर आज अवतरले. पवार यांनी आज दुर्घटनाग्रस्त पुलाच्या ठिकाणी भेट दिली. तसेच, रुग्णालयात जाऊन दुर्घटनेतील जखमींची विचारपूस केली. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी पुणे जिह्यातील जे धोक्याचे पूल आहेत, तसेच, जे लोकांच्या वापरण्याच्या योग्यतेचे नाहीत, त्याठिकाणी प्रवेश बंदीचे फलक लावण्यापेक्षा असे आयुष्य संपलेले तसेच स्ट्रक्चरल ऑडिटर्स यांनी वापरण्यास धोकादायक असा शेरा दिलेले सर्व धोकादायक पूल पाडण्यात येतील, अशी माहिती दिली.

पुंडमळा येथील इंद्रायणी नदीवरील लोखंडी पूल कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेत वर्षा विहारासाठी आलेले 55 पर्यटक नदीपात्रात पडले. या दुर्घटनेत चार पर्यटक मृत्युमुखी पडले. तर, 51 जण जखमी झाले. मात्र, एवढी गंभीर घटना घडूनही राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिह्याचे पालकमंत्री असलेले अजित पवार यांना घटनास्थळी भेट देण्यास वेळ मिळाला नाही. पक्षाच्या प्रचार कार्यात गुंतलेल्या अजित दादांनी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या जखमींना भेटण्याची साधी तसदीही त्यांनी घेतली नाही. त्यामुळे गायब असलेल्या अजित पवार यांच्याबाबत चर्चेला उधाण आले होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;