झाडाला गळफास घेऊन वारकऱ्याने आयुष्य संपवले

झाडाला गळफास घेऊन वारकऱ्याने आयुष्य संपवले

नगर तालुक्यातील राईछत्तिसी गावच्या शिवारात शेतातील कडूनिंबाच्या झाडाला गळफास घेऊन एका वारकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (30 जून) सकाळी उघडकीस आली. सुखदेव लक्ष्मण रावे (वय 62, रा. मिसळवाडी, बुलढाणा) असे आत्महत्या केलेल्या वारकऱ्याचे नाव आहे.

सुखदेव राणे यांचा केसकर्तनाचा व्यवसाय असून, ते दरवर्षी पंढरपूरची वारी करत होते. या वर्षी ते गावाहून आळंदी येथे गेले. तेथून दिंडीत सहभागी झाले. दिंडीचा मुक्काम नातेपुते येथे असताना त्यांनी एसटी बसने पंढरपूर गाठले. श्री विठ्ठलाचे दर्शन घेऊन ते पुन्हा एसटी बसने गावाकडे जात होते. मात्र, 29 जून रोजी सायंकाळी ते रुईछत्तिशी गावाजवळ उतरले होते. त्यानंतर 30 जून रोजी सकाळी धर्माअण्णा गोरे यांच्या शेतात कडूनिंबाच्या झाडाला त्यांनी गळफास घेतल्याचे निदर्शनास आले.

घटनेची माहिती मिळताच नगर तालुका पोलिसांनी रावे यांना उपचारांसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. याप्रकरणी ‘अकस्मात मृत्यू’ची नोंद केली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;