शिल्पा शेट्टी दररोज सकाळी पिते हे जादुई ड्रिंक;फिटनेस अन् सुंदरतेच रहस्य
बॉलिवूडमध्ये कलाकारांच्या चित्रपटांसोबतच त्यांच्या डाएटची देखील तेवढीच चर्चा होते. लाखो चाहते त्यांना फॉलो करतात. अनेक कलाकार त्यांचे डाएट, किंवा फिटनेसमंत्रा त्यांच्या सोशल मीडियावर शेअर करत असतात. त्यातील एक आहे शिल्पा शेट्टी. शिल्पा शेट्टी सोशल मीडियावर कायम योगासने, तिचे डाएट शेअर करत असते. शिल्पा शेट्टी तिच्या अभिनयासोबतच फिटनेससाठी ओळखली जाते. वयाच्या 50 व्या वर्षीही तिच्या त्वचेची चमक आणि ऊर्जा पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटते. याचे रहस्य फक्त व्यायाम नाही तर तिचे मॉर्निंग हेल्थ ड्रिंक देखील आहे, जे ती दररोज रिकाम्या पोटी पिते. शिल्पा शेट्टीने सोशल मीडियावरही सांगितले आहे.की ती दररोज सकाळी उठून सर्वात आधी एक पेय पिते. शिल्पाच्या आरोग्याचे हे रहस्य जाणून घेऊयात.
शिल्पा शेट्टी तिची सकाळची सुरुवात एका खास पद्धतीने करते. एका संभाषणादरम्यान तिने सांगितले की ती दररोज रिकाम्या पोटी एक घरगुती पेय घेते, ज्यामध्ये कोमट पाणी, देशी तूप, हळद आणि थोडी काळी मिरी असते. याच पेयाने तिची सकाळीच सुरुवात होते.
या ड्रिंकचे फायदे काय आहेत ते जाणून घेऊयात.
फायदे
पचनसंस्था मजबूत करते: या पेयामध्ये असलेले तूप आणि हळद पोट स्वच्छ ठेवण्यास मदत करते. यामुळे अन्न लवकर पचण्यास मदत होते आणि गॅस किंवा अपचन सारख्या समस्या उद्भवत नाहीत.
वजन कमी करण्यास उपयुक्त: कोमट पाणी आणि काळी मिरी चयापचय गतिमान करतात. यामुळे शरीरात साठलेली चरबी लवकर जाळते आणि वजन कमी करण्यास मदत होते.
रोगप्रतिकारक शक्ती वाढवते: हळद आणि काळी मिरीमध्ये अँटीऑक्सिडंट आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात जे शरीराची रोगांशी लढण्याची क्षमता वाढवतात.
त्वचा चमकदार बनवते: हे पेय शरीराला आतून डिटॉक्स करते, ज्यामुळे त्वचा स्वच्छ आणि चमकदार दिसते. पिंपल्स आणि डाग देखील कमी होतात.
शरीरात ऊर्जा टिकवून ठेवते: तूप हे एक नैसर्गिक उर्जेचे स्रोत आहे. सकाळी ते सेवन केल्याने शरीर दिवसभर सक्रिय आणि ताजेतवाने राहते.
तर अशापद्धतीने शिल्पा शेट्टीने सांगितलेलं हे ड्रिंक तुम्हीही घेऊ शकता. मग पाहा शरीरात काय फायदे होतात ते. तसेच शिल्पा शेट्टीने सांगितल्याप्रमाणे तुम्ही जे सोपे योगासने आहेत तेही ट्राय करू शकता. त्यामुळे देखील बऱ्यापैकी शरीरातील चरबी कमी होण्यास मदत होते.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List