ठाणे पालिकेचे आवाहन झुगारले, दिव्यात बेकायदा शाळांविरोधात उद्यापासून अधिकृत शाळांचा बंद

ठाणे पालिकेचे आवाहन झुगारले, दिव्यात बेकायदा शाळांविरोधात उद्यापासून अधिकृत शाळांचा बंद

पालिकेने केलेले आवाहन झुगारून बेकायदा शाळांविरोधात दंड थोपटत दिव्यातील अधिकृत शाळांनी मंगळवारपासून ‘बेमुदत बंद’ची हाक दिली आहे. वारंवार अर्ज-विनंत्या-आंदोलने करूनही अनधिकृत शाळांवर कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने 19 अधिकृत शाळांनी ‘बंद’चे हत्यार उपसले आहे. पालिकेच्या प्रशासनाने कितीही दबाव आणण्याचा प्रयत्न केला तरी 1 जुलैपासून बंद पुकारणारच, असा निर्धार इंडिपेंडेंट स्कूल संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

ठाणे महापालिका दरवर्षी बेकायदा शाळांची यादी जाहीर करते. मात्र या शाळांची संख्या कमी होण्याऐवजी वाढतच चालली आहे. 2023 मध्ये या जिल्ह्यातील बेकायदा शाळांची संख्या 45 इतकी होती. ती आता 81 वर येऊन पोहोचली आहे. धक्कादायक म्हणजे या 81 शाळांपैकी 69 शाळा या फक्त दिव्यात आहेत. या बेकायदा शाळांविरोधात अधिकृत शाळा संचाल कांनी याआधीही दोनवेळा आंदोलनाचा इशारा महापालिकेच्या शिक्षण विभागाला दिला होता.

महापालिकेच्या वतीने या अनधिकृत शाळांवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र अद्याप या शाळांवर कोणतीही कारवाई झालेली नाही. महापालिका खोटी आश्वासन देऊन फसवणूक करत असल्याचा दावा अधिकृत शाळा संचालकांनी केला आहे.

महापालिकेच्या या फसव्या आश्वासनांना बळी न पडत बेमुदत बंद अंदोलन सुरू राहणार म्हणचे राहणारच, असा पवित्रा अधिकृत शाळा संचालकांनी इंडिपेंडेंट स्कूल संघटनेच्या वतीने हाती घेतला आहे.

प्रशासनाने वाचला कारवाईचा पाढा

शिक्षणाधिकारी कमलाकांत म्हेत्रे यांनी इंडिपेंडेंट स्कूल संघटनेसोबत पत्रव्यवहार करून विद्यार्थ्यांच्या हितासाठी आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले आहे. या बेकायदा शाळा बंद करण्यासाठी महापालिकेमार्फत जनजागृती केली जात आहे. तसेच या शाळांवर कारवाईचा बडगा उगारत 32 शाळांचे पाणीपुरवठा बंद केला आहे. तसेच सर्व शाळांना करणे दाखवा नोटिसा बजावत कायदेशीर तरतुदीनुसार दंड आकारणी केली आहे. तसेच या शाळांवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी प्रशासन कसोशीने पाठपुरावा करत असल्याचे सांगत हे आंदोलन मागे घेण्याचे आवाहन महापालिकेने इंडिपेंडेंट स्कूल संघटनेला केले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

जिभेवर पिवळे किंवा लाल रंग दिसणे म्हणजे या आजाराची लक्षणे…, तज्ज्ञांनी सांगितलं हे रंग हलक्यात घेऊ नका? जिभेवर पिवळे किंवा लाल रंग दिसणे म्हणजे या आजाराची लक्षणे…, तज्ज्ञांनी सांगितलं हे रंग हलक्यात घेऊ नका?
आपणअनेकदा पाहिले असेल की जेव्हा जेव्हा आपण आजारी पडतो तेव्हा डॉक्टर प्रथम आपल्या जिभ तपासतात. कारण केवळ चव जाणवण्याव्यतिरिक्त, जीभ...
Mumbai News – मुंबई विमानतळावर कार्गो ट्रकची विमानाला टक्कर, घटनेची चौकशी सुरू
सर्वोच्च न्यायालयच शेवटची आशा, निवडणूक आयोगाला पक्षाचे नाव बदलाचा किंवा कोणाला देण्याचा अधिकार नाही – उद्धव ठाकरे
Video – : महाराष्ट्रातला मंत्रीही सुरक्षित नाही- अनिल परब
Video – हा पुरोगामी विचारांवर हल्ला – विजय वडेट्टीवार
देवेंद्र फडणवीसांच्या आदेशालाच केराची टोपली; वगळलेला ‘स्मार्ट’ ठेकेदार 750 कोटींच्या टेंडरला ठरला पात्र, राजकीय वर्तुळात चर्चा
रत्नागिरीत 94 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण जाहीर; या ठिकाणी होणार महिला सरपंच