लाडक्या बहिणींना लाच देत सत्ताधाऱ्यांनी मतदान करवून घेतले; ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखेडे यांचा आरोप

लाडक्या बहिणींना लाच देत सत्ताधाऱ्यांनी मतदान करवून घेतले; ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखेडे यांचा आरोप

सध्या देशात लोकशाहीची स्थिती विदारक झाली आहे. निवडणुकीच्या माध्यमातून जनतेला अपेक्षित असलेले उमेदवार निवडून न येता हेराफेरी करुन मतदान यंत्रात बदल करुन सत्ता स्थापन करण्यात आली. ही विदारक बाब असल्याचे सांगून सत्ताधाऱ्यांनी लाडकी बहिणी योजनेचे पैसे लाचेच्या स्वरुपात मतदारांना देत मतदान करून घेतल्याचा आरोप ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखेडे यांनी केला आहे.

डॉ. यशपाल भिंगे व महेश देशमुख तरोडेकर यांनी आयोजित केलेल्या प.पू. स्वामी रामानंद तीर्थ स्मृती व्याख्यानमालेत पहिले पुष्प गुंफतांना ते बोलत होते. वानखेडे यांना भारतीय लोकशाहीचे भवितव्य हा व्याख्यानाचा विषय देण्यात आला होता. त्यावेळी ते म्हणाले, भारतीय लोकशाहीचे भवितव्य पूर्णतः धोक्यात आले असून 2014 पासून देशात आलेले सरकार हे हुकूमशाही पध्दतीने जनतेची दिशाभूल करुन वेगवेगळी आश्वासने देत या देशातील लोकशाही धोक्यात आणण्याचा प्रयत्न करत आहे. देशातील संविधान धोक्यात आले असून मागच्या काही काळात झालेल्या घटना, सत्ताधारी मंडळींची बेताल वक्तव्य, लोकसभेत जबाबदार मंत्र्यांची बेताल वक्तव्य लक्षात घेता या लोकशाहीचे अधःपतन होत असल्याचा आरोप त्यांनी केला.

निवडणुकीतील मतदानाची वेळ संपल्यानंतर महाराष्ट्रात सर्व ठिकाणी एकाचवेळी मतदानासाठी रांगा लागतात, हे मोठे आश्चर्य आहे. जवळपास आठ टक्के मतदान या वाढीव काळात वाढविण्यात आले. याबद्दल जागरुक मतदार कसा काय आवाज उठवत नाही, असा सवाल त्यांनी केला. गुजरातमध्ये झालेल्या निवडणुकीत एका मिनिटात तीन मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला हे आश्चर्यकारक आहे. वास्तविक एका मतदाराला जवळपास चार मिनिटे लागत असताना हा चमत्कार गुजरातमध्ये घडला हे लोकांनी उघड्या डोळ्यांनी बघितले.

लाडक्या बहिण योजनेच्या माध्यमातून मिळालेल्या पैशांतून तुम्ही मत विकल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. वेगवेगळ्या योजना निवडणुकीच्या काळात जाहीर करुन जनतेची फसवणूक करण्याचे काम राज्यातील सरकारकडून सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. सरकारच्या विरोधात बोलणार्‍यांची बोलती बंद केली जाते, त्यांच्याविरुध्द ईडी, सीबीआय, मनिलॉड्रींगच्या माध्यमातून भिती दाखवून अटक केली जात आहे. अनिल देशमुखसारख्या मंत्र्यावर चुकीचे आरोप करुन शंभर कोटीची वसुली केल्याचे सांगण्यात आले. मात्र प्रत्यक्षात दिड कोटीचाही आकडा समोर आला नाही. तेरा महिने ते जेलमध्ये होते. हे चित्र विदारक व दहशत पसरविण्यासारखे असल्याचे त्यांनी सांगितले. ईडी, सीबीआयसारख्या संस्थामार्फत विरोधकांना भिती दाखवून त्रस्त केले जात आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी याला घाबरुनच भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. चक्की पिसिंगच्या घोषणा करुन अजित पवारांविरुध्द आरोप करणारे आज मांडीला मांडी लावून बसले आहेत. आज त्याच चक्कीमधील पीठ आपण खात आहोत, असा आरोपही त्यांनी केला. भारतीय लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर मतदारांनी जागरुकपणे योग्य उमेदवारालाच मतदान केले पाहिजे, असेही ते म्हणाले. या कार्यक्रमाला शहर आणि जिल्ह्यातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Air India विमान दुर्घटनेनंतर DGCA सतर्क, सर्व बोइंग विमानांमध्ये ‘फ्युएल स्विच लॉक’ तपासणी केली बंधनकारक Air India विमान दुर्घटनेनंतर DGCA सतर्क, सर्व बोइंग विमानांमध्ये ‘फ्युएल स्विच लॉक’ तपासणी केली बंधनकारक
अहमदाबाद येथे झालेल्या एअर इंडिया विमान दुर्घटनेनंतर नागरी विमानन महासंचालनालयाने (DGCA) एक महत्त्वपूर्ण सुरक्षा आदेश जारी केला आहे. सर्व हिंदुस्थानी...
Latur News – तिर्रट जुगार खेळणाऱ्या 37 जणांवर गुन्हा दाखल, 5 लाखांचा मुद्देमाल जप्त
बिहारला देशाचे क्राइम कॅपिटल बनले, नीतीश कुमार आणि भाजपवर राहुल गांधींचा हल्लाबोल
Mumbai News – मद्यधुंद अवस्थेत रात्री जुहू बीचवर ड्रायव्हिंग, वाळूत कार अडकली; तिघांवर गुन्हा दाखल
शरीरात दिसणारी ही चिन्हे मधुमेहाची सुरुवाती लक्षणे असू शकतात; तुम्ही टेस्ट न करताही ओळखू शकता
Ratnagiri News – रत्नागिरी जिल्ह्याला ‘एक जिल्हा एक उत्पादन’ राष्ट्रीय पुरस्कार 2024 प्राप्त; हापूस आंब्याने मिळवला सुवर्णपदकाचा मान
राज्याचं महसूल वाढवण्यासाठी नवीन दारू परवाने देणं योग्य नाही, या धोरणामुळे जनजीवन विस्कळीत होऊ शकतं – अंबादास दानवे