रत्नागिरीत 94 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण जाहीर; या ठिकाणी होणार महिला सरपंच

रत्नागिरीत 94 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण जाहीर; या ठिकाणी होणार महिला सरपंच

रत्नागिरी तालुक्यातील 94 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडत सोमवारी काढण्यात आली. तालुक्यातील गणपतीपुळे,गोळप,कुवारबांव आणि नांदिवडे या महत्वाच्या ग्रामपंचायती सर्वसाधारण प्रवर्गाकडे, नाचणे, मिरजोळे सर्वसाधारण महिला प्रवर्ग ,शिरगाव नागरिकांचा मागास प्रवर्ग तर हरचेरीतील सरपंचपद अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाले आहेत. काहींना अपेक्षित आरक्षण मिळाल्याने आनंद तर काहींनी यंदाही सरपंचपदाची संधी हुकल्याने नाराजी व्यक्त केली आहे.

सर्वसाधारण प्रवर्गात सडामिऱ्या, राई, गणपतीपुळे, गुंबद, चांदोर, निवेंडी, करबुडे, निरूळ, बसणी, साठरे, मालगुंड, कुवारबांव, वेळवंड, कासारवेली, तोणदे,सोमेश्वर, केळ्ये, गणेशगुळे, पूर्णगड, कासारी, फणसोफ, चिंद्रवली, झरेवाडी, रानपाट, भगवतीनगर,ओरी,भोके,गोळप,नांदिवडे,पोमेंडी बुद्रूक,कर्ला यांचा समावेश आहे.

सर्वसाधारण महिला प्रवर्गात काळबादेवी, देऊड,चांदेराई, तरवळ, शिवारआंबेरे, विल्ये, नाचणे, नाणीज, बोंड्ये, टेंभ्ये, टिके, सत्कोंडी, वळके, वेतोशी, वरवडे, गावखडी, केळशी, मिरजोळे, खानू, कोतवडे, गडनरळ, मजगाव, लाजूळ, सैतवडे, फणसवळे, नेवरे, डोर्ले, प्रिंदवणे, जांभारी, जांभरूण, चवे, चाफेरी यांचा समावेश आहे.

नागरिकांचा मागास प्रवर्गात मेर्वी, कळझोंडी, निवळी, उक्षी, पावस, चाफे, भाट्ये, चरवेली, नाखरे, आगरनरळ, मावळंगे, शिरगाव, पानवल यांचा समावेश आहे.

नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला गावडेआंबेरे,पाली,खरवते,रिळ, कापडगाव,हातखंबा,पोमेंडी खुर्द,साखर मोहल्ला, मिऱ्या, कोळंबे, जयगड,खालगाव,दांडेआडोम यांचा समावेश आहे. अनुसूचित जाती प्रवर्गात धामणसे,हरचिरी,कुरतडे यांचा समावेश आहे. तर अनुसूचित जाती महिला प्रवर्गात कशेळी,वाटद यांचा समावेश आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

शरीरात दिसणारी ही चिन्हे मधुमेहाची सुरुवाती लक्षणे असू शकतात; तुम्ही टेस्ट न करताही ओळखू शकता शरीरात दिसणारी ही चिन्हे मधुमेहाची सुरुवाती लक्षणे असू शकतात; तुम्ही टेस्ट न करताही ओळखू शकता
आजकाल फार कमी वयात मुला-मुलींना डायबिटीस होताना दिसत आहे. रोजची लाईफस्टाईल पाहता डायबिटीस होणं म्हणजे अगदी सामान्य बाब झाली आहे....
Ratnagiri News – रत्नागिरी जिल्ह्याला ‘एक जिल्हा एक उत्पादन’ राष्ट्रीय पुरस्कार 2024 प्राप्त; हापूस आंब्याने मिळवला सुवर्णपदकाचा मान
राज्याचं महसूल वाढवण्यासाठी नवीन दारू परवाने देणं योग्य नाही, या धोरणामुळे जनजीवन विस्कळीत होऊ शकतं – अंबादास दानवे
Photo – काळ्या सुटमध्ये रुबाबदार सौंदर्य, वैदेही परशुरामीचा बॉसी लूक
चंद्रपुरात रेस्टॉरंट अ‍ॅन्ड बार असोसिएशनचे आंदोलन; सरकारच्या करवाढीचा केला निषेध
रशियाचे Mi-8 हेलिकॉप्टर बेपत्ता, उड्डाणानंतर काही वेळातच संपर्क तुटला
Nanded News – भाजप आमदाराची सहकार विभागाच्या उपनिबंधकाला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ, कथित ऑडिओ क्लिप व्हायरल