5 जुलैचा एकत्रीत मोर्चा आता निघणार नाही; पण..ठाकरे हाच ब्रँड! – संजय राऊत
हिंदी सक्तीच्या निर्णयाविरोधात राज्यात मराठी जनतेने आवाज बुलंद केला होता. तसेच हिंदीला विरोध नसून कोणत्याही भाषेची सक्ती खपवून घेणार नाही, असा इशारा शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) दिला होता. ठाकरे बंधूनी 5 जुलैला हिंदी सक्तीविरोधात जाहीर केलेल्या मोर्चामुळे सरकारने हिंदी सक्तीबाबतचा शासन निर्णय रद्द केला आहे. याबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ठाकरे बंधू एकत्र येणार याचा धसका सत्ताधाऱ्यांनी घेतला आणि हिंदी सक्तीचा सरकारी आदेश रद्द करण्यात आला, असे त्यांनी म्हटले आहे. तसेच 5 जुलैचा एकत्रीत मोर्चा आता निघणार नाही;पण..ठाकरे हाच ब्रँड! असे ते ठणकावून म्हणाले.
हिंदी सक्तीचा सरकारी आदेश रद्द!
हा मराठी एकजुटीचा विजय,
ठाकरे एकत्र येणार याचा धसका,
५ जुलैचा एकत्रीत मोर्चा आता निघणार नाही;पण..
ठाकरे हाच ब्रँड!
(फडणवीस यांनी घेतलेला शहाणपणाचा निर्णय.छान) pic.twitter.com/eTm1Rei41B— Sanjay Raut (@rautsanjay61) June 29, 2025
हिंदी सक्तीचा शासन निर्णय रद्द करण्यात आल्यानंतर संजय राऊत यांनी एक्सवर प्रतिक्रिया दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, हिंदी सक्तीचा सरकारी आदेश रद्द! हा मराठी एकजुटीचा विजय, ठाकरे एकत्र येणार याचा धसका, 5 जुलैचा एकत्रीत मोर्चा आता निघणार नाही;पण..ठाकरे हाच ब्रँड! (फडणवीस यांनी घेतलेला शहाणपणाचा निर्णय.छान), असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List