सुरुवात तुम्ही केली, शेवट आम्ही करू! इराणची अमेरिकेला धमकी, सरकारी वाहिनीवरून मोठी घोषणा

सुरुवात तुम्ही केली, शेवट आम्ही करू! इराणची अमेरिकेला धमकी, सरकारी वाहिनीवरून मोठी घोषणा

अखेर ज्याची भीती होते तेच झाले असून इस्रायल-इराण संघर्षात अमेरिकाही सहभागी झाली आहे. अमेरिकेने इराणच्या फोर्डो, नतांझ आणि इस्फहान या तीन आण्विक तळांवर हवाई हल्ला केला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आधी ट्विट करून आणि त्यानंतर व्हाईट हाऊसमधून संबोधित करून याबाबत माहिती दिली. या हल्ल्यानंतर इराणने अमेरिकेला धमकी देत सरकारी वाहिनीवरून मोठी घोषणा केली. त्यामुळे जगाची वाटचाल महायुद्धाकडे सुरू असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

अमेरिकेने आण्विक तळांवर हल्ले केल्यानंतर इराण चांगला संतापला आहे. इराणच्या सरकारी वृत्तवाहिनीवरून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी उघडपणे धमकी देण्यात आली आहे. पश्चिम आशियातील प्रत्येक अमेरिकन नागरीक आणि त्यांचा जवान आता आपले लक्ष्य आहे, अशी धमकी इराणने दिली.

इराणच्या हवाई हद्दीचे उल्लंघन करून अमेरिकेने मोठा गुन्हा केला आहे. पश्चिम आशियाई प्रदेशामध्ये अमेरिकेला कोणतेही स्थान नाही. अमेरिकेचे अध्यक्ष, युद्ध तुम्ही सुरू केले आहे, शेवट आम्ही करू. अमेरिकाही इराणच्या फायर रेंजमध्ये आहे,  अशी धमकी इराणच्या सरकारी वृत्तवाहिनीवरून देण्यात आली. त्यामुळे आगामी काळात इराण-इस्रायल युद्धाची झळ अमेरिकेलाही पोहोचण्याची शक्यता आहे. ‘न्यूज 18‘ने याबाबत वृत्त दिले आहे.

दरम्यान, इराणच्या मदतीला येमेनमधील हुथी बंडखोर आले आहेत. येमेनमधील हुथी बंडखोरांनी अमेरिकेला टोकाचा इशारा दिला आहे. इराण-इस्रायल युद्धामध्ये अमेरिका सहभागी झाली तर लाल समुद्रातील अमेरिकन जहाजांवर आणि युद्धनौकांवर हल्ले करू, अशी धमकी हुथी बंडखोरांनी एक व्हिडीओ जारी करत दिली आहे.

US airstrikes on Iran – इस्रायल-इराण युद्धामध्ये अमेरिकेची उडी, इराणच्या 3 आण्विक तळांवर हल्ला

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

कितीही मोठ्या बापाचा असू दे टायरमध्ये घालून झोडा, अजितदादांचे आदेश कितीही मोठ्या बापाचा असू दे टायरमध्ये घालून झोडा, अजितदादांचे आदेश
वाहतुकीच्या नियमांचे पालन झालेच पाहिजे. नियमांचे उल्लंघन करणारा माझा नातेवाईक असला तरी त्याला टायरमध्ये घालून झोडायला सांगणार आहे, असा इशारा...
बेळगावातील कन्नड सक्तीच्या विरोधात मराठी भाषिक रस्त्यावर उतरणार!
युरोपीय युनियन, मेक्सिकोवर टेरिफ बॉम्ब डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा, 1 ऑगस्टपासून होणार लागू
रंगभूमी- चिंतन नियतीवादाचे
कृषिभान- वाटचाल कुपोषणाकडून उपोषणाकडे!
माधुरीला गुजरातला पाठवण्यास विरोध, हायकोर्टाने राखून ठेवला निकाल; कोल्हापुरातील जैन संस्थेच्या हत्तीणीच्या स्थलांतराला आव्हान
विशेष – ‘उत्तराधिकारी’ निवडीचे भूराजकीय पडसाद!