साय-फाय – ओशन डार्कनिंग

साय-फाय – ओशन डार्कनिंग

>> प्रसाद ताम्हनकर

पृथ्वीच्या पृष्ठभागाचा 71 टक्के भाग हा पाण्याने व्यापलेला आहे. यामध्ये पाच मुख्य महासागर आहेत, अटलांटिक, पॅसिफिक, हिंद, आर्टिक्ट आणि अंटार्क्टिक. मात्र आता या महासागरांमध्ये अंधार पसरत चाललेला आहे आणि संशोधकांसाठी एका नव्या संकटाची चाहूल लागलेली आहे. ब्रिटनच्या प्लायमाऊथ विद्यापीठातील संशोधकांनी नुकताच यासंदर्भात त्यांचा अभ्यास जाहीर केला आहे. त्यांनी केलेल्या संशोधनात साल 2002 ते 2022 दरम्यान जागतिक महासागराचा 21 टक्के भाग अंधारमय झाल्याचे समोर आले आहे. संशोधकांनी हा बदल समोर आणण्यासाठी 20 वर्षांचा उपग्रहाद्वारे जमा केलेला डाटा आणि

अॅडव्हान्स कॉम्प्युटर मॉडेलिंगची मदत घेतली. गेल्या दोन दशकांपासून प्रकाशाला समुद्रात प्रवेश करणे अवघड होत चालले आहे. या परिस्थितीला ओशन डार्कनिंग असे म्हटले जाते. या घडत असलेल्या बदलामुळे संशोधकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. ही बदलती परिस्थिती पृथ्वीच्या आरोग्यासाठी आणि समुद्राच्या आरोग्यासाठीदेखील धोकादायक. यामुळे समुद्री जिवांच्या प्रजोत्पादनावरदेखील परिणाम होण्याची भीती आहे. प्रकाशावर अवलंबून असलेल्या अनेक समुद्री जिवांना यामुळे धोका उत्पन्न झाला आहे. आज मानवदेखील मोठय़ा प्रमाणावर अन्नासाठी आणि हवामान बदलाच्या विरोधात मदतीसाठी महासागरांवर अवलंबून आहे.

समुद्राच्या आतील ज्या भागापर्यंत सूर्यप्रकाश व्यवस्थित पोहोचतो, त्या भागाला `फोटिक झोन’ असे म्हणले जाते. 90 टक्के समुद्री जीव या फोटिक झोनमध्ये आढळून येतात. जैव रासायनिक पा व्यवस्थित चालण्यासाठी याची खूप आवश्यकता आहे. या अभ्यासात असे आढळून आले आहे की, समुद्री पाण्यात शैवालाच्या वाढीच्या प्रक्रियेत होत असलेले बदल आणि समुद्राच्या पृष्ठभागाचे बदलते तापमान हे समुद्रात अंधार पसरत चालल्याचे एक प्रमुख कारण आहे. ही परिस्थिती किनारपट्टी भागात मोठय़ा प्रमाणावर आढळते.

किनारपट्टीच्या भागात पोषक तत्त्वांनी समृद्ध असे समुद्राचे पाणी पृष्ठभागावर येते आणि मुसळधार पावसामुळे शेतातील अतिरिक्त पाणी व गाळ जमिनीद्वारे पाण्यात वाहून जातो. त्यामुळे समुद्राच्या पृष्ठभागावर राहणाऱ्या सूक्ष्म जिवांना पोषण मिळते. या जिवांना प्लवक असे म्हटले जाते. सध्या मोठय़ा प्रमाणावर होत असलेल्या हवामान बदलामुळे जगातील अनेक प्रदेशात पावसाचे प्रमाण वाढलेले आहे. हे वाढते प्रमाण तसेच समुद्राच्या पृष्ठभागावर वाढत चाललेले तापमान यामुळे समुद्राच्या पृष्ठभागावर या प्लवकांची संख्या वाढू शकते आणि ही वाढती संख्या प्रकाशाला समुद्रात जाण्यापासून रोखू शकते.

समुद्रात पसरत चाललेल्या या अंधारामुळे आपल्या अस्तित्वासाठी आणि प्रजननासाठी सूर्य व चंद्र यांच्यावर अवलंबून असलेल्या समुद्री जिवांना फार मोठा धोका निर्माण होऊ शकतो. समुद्रात जसा अंधार पसरत जाईल तसा त्यांच्या जीवनासाठी आवश्यक असलेला फोटिक झोन हा आकुंचन पावत जाणार आहे. प्रकाश कमी होत गेला की, आवश्यक प्रकाशासाठी काही समुद्री जीव हे पृष्ठभागाकडे धाव घेतील आणि अन्न व इतर आवश्यक गरजांसाठी त्यांच्यात तीव्र संघर्ष निर्माण होईल.

महासागराच्या नऊ टक्क्यांपेक्षा जास्त भागात (हा भाग आफ्रिकेच्या आकाराच्या बरोबरीचा आहे) फोटिक झोनची खोल 164 फूट अर्थात 50 मीटरने कमी झाली आहे, तर महासागराच्या 2.6 टक्के भागात फोटिक झोनची खोली 328 फूट म्हणजेच 100 मीटरने कमी झालेली आहे. हवामान बदलाचे परिणाम जिथे सर्वाधिक जाणवत आहेत अशा गल्फ स्ट्रीम, आर्क्टिक आणि अंटार्क्टिक प्रदेशांमध्ये फोटिक झोनच्या खोलीत लक्षणीय बदल आढळून आले आहेत. किनारपट्टीच्या भागांमध्ये आणि बाल्टिक समुद्रातदेखील ओशन डार्कनिंगचे प्रमाण जास्त असल्याचे दिसते आहे.

संशोधकांचा हा अभ्यास चिंता वाढवणारा असला तरी या 20 वर्षांच्या काळात महासागरातील 10 टक्के भागात फोटिक झोनची खोली वाढल्याचेदेखील निदर्शनास आले आहे. फोटिक झोनची खोली वाढणे हे समुद्री वनस्पतींसह समुद्री जिवांसाठीही अत्यावश्यक आहे. या समुद्री वनस्पती अर्थात प्लवक हे वातावरणातील अर्धा ऑक्सिजन तयार करत असतात. त्यामुळे कार्बन पासाठी अन्नसाखळीसाठी फोटिक झोनची वाढती खोली महत्त्वाची असणार आहे.

[email protected]

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

उपचारादरम्यान वाघाचा प्राणीरक्षकावर हल्ला उपचारादरम्यान वाघाचा प्राणीरक्षकावर हल्ला
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील वैद्यकीय पिंजऱ्यामध्ये उपचार करतेवेळी टी-5 या वाघाने प्राणीरक्षकावर हल्ला केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्या रक्षकाने...
राजा रघुवंशी हत्या प्रकरणात दोघांना जामीन मंजूर, शिलाँग कोर्टाचा निर्णय
Pune News – बारामती पालखी महामार्गावर कार आणि दुचाकीचा भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू
IND vs ENG 3rd Test – टीम इंडियाची घोडदौड 387 धावांवर थांबली, तिसऱ्या दिवसाचा खेळ समाप्त; इंग्लंडने घेतली आघाडी
Baloch Army Attack – बलूच सैन्याच्या हल्ल्यात 50 पाकिस्तानी सैनिक ठार, बीएलएफचा दावा
Jammu Kashmir – एसयूव्ही कार 600 फूट दरीत कोसळली, 5 जणांचा मृत्यू; एक गंभीर जखमी
Ratnagiri News – पळवून लावलं तरी बिबट्या गुरांच्या गोठ्यातच येऊन बसायचा, अखेर वनविभागाने केले जेरबंद