पीएमपीएल तिकीट दरवाढीला शिवसेनेचा विरोध

पीएमपीएल तिकीट दरवाढीला शिवसेनेचा विरोध

पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपीएल) बसची तिकीट दरवाढ दुपटीने केली आहे. पीएमपीएलची दरवाढ करून प्रश्न सुटणार नाही, तर पीएमपीएलमधील होत असलेला भ्रष्टाचार बंद केला अथवा कमी केला तर भाडेवाढ करण्याची गरज पडणार नाही. त्यामुळे या बेकायदेशीर दरवाढीला शिवसेनेचा (उद्धव बाळासाहेब ठाकरे) विरोध असून दरवाढ मागे न घेतल्यास पुणे शहर शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा शिवसेनेच्या शिष्टमंडळाने दिला.

याबाबत शिवसेनेच्या शिष्टमंडळाने पीएमपीएलचे सहव्यवस्थापक नितीन नार्वेकर यांना निवेदन दिले. याप्रसंगी पुणे शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, प्रवीण डोंगरे, अतुल दिघे, राहुल शेडगे, परेश खांडके, नागेश खडके, संजय वाल्हेकर, महिला आघाडीच्या रोहिणी कोल्हाळ, पद्मा सोरेटे, विद्या होडे, सविता गोसावी, विजय मोहिते, गिरीश गायकवाड, राजेश माने, अजय परदेशी, रमेश परदेशी, किरण राऊत, मिलिंद पत्की, शशिकांत खेंगरे, संतोष होडे आदी उपस्थित होते.

पीएमपीएलची भाडेवाढ होऊ नये यासाठी दोन्ही महापालिका, पीएमआरडीए निधी देतात. त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे. याकडे आपण महाव्यवस्थापक म्हणून गांभीर्याने लक्ष दिल्यास भाडेवाढ करण्याची गरज पडणार नाही. तसेच पीएमपीएल यांना जाहिरातीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळते. पीएमपीएलच्या जागा भाड्याने दिल्या आहेत, त्यामधून चांगले उत्पन्न मिळत आहे. चारही बाजूने पीएमपीएलला उत्पन्न असताना भाडेवाढ करण्याची गरज का लागत आहे? असा सवाल शिष्टमंडळाने उपस्थित केला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;