मुंबईकर म्हणतात, कचऱ्यावर कर आकारू नका! दोन महिन्यांत 2,774 हरकती-सूचना

मुंबईकर म्हणतात, कचऱ्यावर कर आकारू नका! दोन महिन्यांत 2,774 हरकती-सूचना

मुंबई महापालिका आशियातील सर्वात श्रीमंत महापालिका आहे. वीज, पाणी, रस्ते, आरोग्य, शिक्षण यासारख्या सुविधा माफक दरात देत असली तरी महापालिकेने मुंबईकरांवर कचरा कर आकारू नये, अशा सूचना केल्या आहेत. विशेष करून गरीब कुटुंबांवर शुल्क आकारू नका तर मुंबईत मोठय़ा प्रमाणात कचरा निर्माण करणाऱ्यांकडूनच कर आकारा, अशा सूचना मुंबईकरांनी केल्या आहेत. गेल्या दोन महिन्यांत ई-मेल, व्हॉट्सअॅप, चॅटबॉक्सच्या माध्यमातून 2 हजार 774 हरकती आणि सूचना नोंदवल्या आहेत.

मुंबई महापालिकेने कचरा व्यवस्थापनासाठी नवे धोरण तयार केले असून देशातील इतर महानगरांप्रमाणे मुंबईकरांवरही कचरा कर लावला जाणार आहे. त्यासाठी मुंबई महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन उपविधी धोरणासाठी मुंबई महापालिकेकेने मुंबईकरांकडून 1 एप्रिल ते 31 मे या दोन महिन्यांत हरकती- सूचना मागवल्या होत्या. या दोन महिन्यांत तब्बल 2 हजार 774 हरकती आणि सूचना आल्या. मुंबईकरांनी व्हॉट्सअॅप चॅटबॉट, ई-मेल तसेच लिखित स्वरूपात हरकती आणि सूचना नोंदवल्या आहेत.

अदानी कर लादू देणार नाही

मुंबई महापालिकेने नुकतीच मालमत्ता करात वाढ केली आहे तर आता ‘वेस्ट मॅनेजमेंट फी’च्या नावाखाली ‘अदानी कर’ लादण्याचा प्रयत्न सुरू आहे. या ‘अदानी करा’ला आम्ही सातत्याने विरोध करत आलो आहोत. हा कर थेट मुंबईकरांवर लादला जाणार आहे. जेणेकरून देवनार डम्पिंग ग्राऊंड साफसफाईवर होणारा 2500 कोटींचा खर्च अदानी समूहासाठी मुंबईकरांच्या खिशातून भरता येईल. मात्र अदानी कर मुंबईकरांवर लादू देणार नाही, असे आदित्य ठाकरे यांनी नुकतेच स्पष्ट केले होते.

देवनारच्या सफाई निविदेसाठी 23 जूनपर्यंत मुदतवाढ

मुंबईतील देवनार डम्पिंग ग्राऊडची जागा अदानीला देण्याचे ठरल्यानंतर त्यावरील 185 लाख टन कचऱ्यावर मुंबई महापालिकेलाच स्व खर्चाने प्रक्रिया करावी लागणार आहे. यासाठी सुमारे 2 हजार 368 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. यासाठी काढण्यात आलेल्या निविदेची मुदत आता 23 जूनपर्यंत वाढवण्यात आली आहे. अदानीच्या धारावी पुनर्विकास प्रकल्पातील अपात्र धारावीकरांचे पुनर्वसन देवनार डम्पिंग ग्राऊंडवरील कलेक्टर लॅण्डने मुंबई महापालिकेला लीजवर दिलेल्या जमिनीवर केला जाणार असून त्यासाठी तिथे आतापर्यंत साचलेला 185 लाख टनाचा कचरा साफ करावा लागणार आहे. त्यासाठी काढलेल्या निविदा भरण्यासाठी 21 कंपन्या पुढे आल्या आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;