Weight Loss Diet- वजन कमी करण्यासाठी आहारात ‘हे’ 5 सुपरफुड समाविष्ट करा
वजन कमी करण्यासाठी लोक कमी खाणे किंवा व्यायाम करणे सुरू करतात. पण सर्वकाही करूनही वजन कमी होत नाही त्यामुळे लोक अस्वस्थ होतात, ज्यामुळे त्यांच्या मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम होतो. आजच्या धावपळीच्या जीवनात स्वतःसाठी वेळ काढणे कठीण झाले आहे. जिममध्ये जाण्यासाठी किंवा व्यायाम करण्यासाठीही वेळ मिळत नाही, ज्यामुळे आरोग्यावर परिणाम होतो. तर मग तुम्हीही लठ्ठपणाने त्रस्त आहात का, मात्र खाण्यावर नियंत्रण ठेवू शकत नाही?
काही पदार्थ असे आहेत ज्यात कॅलरीज कमी असतात आणि फायबर भरपूर असते. अशा परिस्थितीत, तुम्ही तुमच्या आहारात असे काही पदार्थ समाविष्ट केले पाहिजेत जे चयापचय वाढवतात आणि चरबी कमी करण्यास मदत करतात. लक्षात ठेवा की वजन कमी करण्यासाठी, जेवण वगळण्याऐवजी योग्य अन्न निवडणे महत्वाचे आहे.
आहारात हे 5 पदार्थ समाविष्ट करा
दही आणि बेरी
दह्यामध्ये प्रथिने भरपूर असतात आणि बेरीमध्ये अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात, त्यामुळे या दोघांचे मिश्रण सर्वोत्तम आहे आणि तुम्ही ते सकाळचा नाश्त्या म्हणून खाऊ शकता. या दोन्ही गोष्टींमध्ये कॅलरीज कमी असतात ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
ड्रायफ्रुट्स
काजू, पिस्ता, बदाम सकाळच्या नाश्त्याच्यावेळी खाऊ शकतात. जर तुम्ही ड्रायफ्रुट्स खात असाल तर ते पाण्यात भिजवून खा. ड्रायफ्रुट्समध्ये निरोगी चरबी, प्रथिने आणि फायबर भरपूर प्रमाणात असतात आणि कॅलरीज कमी असतात, ज्यामुळे तुम्हाला लवकर भूक लागत नाही आणि वजन कमी करणे देखील सोपे होते.
चिया सीड्स
चिया सीड्समध्ये भरपूर पोषक तत्वे असतात. त्यामध्ये फायबर, ओमेगा-३ फॅटी अॅसिड आणि वनस्पती-आधारित प्रथिने असतात, ज्यामुळे ते आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरतात. चिया सीड्स दूध किंवा पाण्यात भिजवून खाव्यात. हा एक आरोग्यदायी नाश्ता असू शकतो.
फळे खा
टरबूज, खरबूज किंवा पपई सारखी फळे खाऊ शकता. यामुळे भूक भागते आणि शरीराला ऊर्जा मिळते. सकाळी फळे खाणे चांगले. ते खाल्ल्याने तुमची रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढते. आणि वजन देखील कंट्रोलमध्ये राहते.
ओट्स खा
जर तुम्हाला वजन लवकर कमी करायचे असेल तर तुम्ही तुमच्या आहारात ओट्सचा समावेश करू शकता. त्यात भरपूर फायबर आणि भरपूर प्रथिने असतात.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List