कल्याणमध्ये भंगार गाड्यांचा डोंगर, लवकरच विक्री होणार

कल्याणमध्ये भंगार गाड्यांचा डोंगर, लवकरच विक्री होणार

उत्पादन शुल्क विभागाने कल्याण व परिसरात छापे टाकून दारूची बेकायदा वाहतूक करणारी वाहने जप्त केली. ताब्यात घेतलेली ही वाहने कल्याणमधील कार्यालयाच्या आवारात गेल्या अनेक वर्षांपासून ठेवण्यात आली आहेत. या गाड्या आता भंगारात गेल्या असून त्याचा अक्षरशः डोंगर झाला आहे. या भंगार गाड्यांमुळे उत्पादन शुल्क विभागाच्या परिसरात दुर्गंधी व डासांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. लवकरात लवकर या भंगार गाड्यांची विल्हेवाट लावावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

कल्याणच्या मुरबाड रोडवरील स्टेट बँकेजवळ उत्पादन शुल्क विभागाचे कार्यालय अनेक वर्षांपासून आहे. या कार्यालयाच्या मोकळ्या जागेत ही सर्व भंगार वाहने ठेवण्यात आली आहेत. ठाणे, नवी मुंबई, रायगड, पालघर, मुरबाड येथील उत्पादन शुल्क विभागाने जप्त केलेली वाहनेदेखील येथे आणल्याने त्याचा डोंगर झाला आहे. या गाड्यांची भंगारात विक्री करण्याचे आदेश देण्यात आले असून त्यात टू व्हिलर, रिक्षा व चार चाकी वाहनांचा समावेश आहे.

लवकरच विक्री
कल्याण कार्यालयाच्या मोकळ्या जागेवर आठ ते नऊ वर्षांपासून ही भंगाराची वाहने आहेत. त्याची विक्री करण्यासाठी चार दिवसांपूर्वी जाहिरात प्रसिद्ध केली असून लवकरच कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती कल्याण शाखेचे वरिष्ठ अधिकारी सुनील कणसे यांनी दिली. इतर विभागातील कार्यालयांनी आपल्या भंगार वाहनांबाबत योग्य तो निर्णय घ्यावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;