पंजाब पोलिसांचा ISI नेटवर्कला मोठा दणका, आणखी एकाला अटक

पंजाब पोलिसांचा ISI नेटवर्कला मोठा दणका, आणखी एकाला अटक

पंजाब पोलिसांनी बुधवारी रूपनगर जिल्ह्यातील महलां गावातील रहिवासी आणि यूट्यूबर जसबीर सिंग याला पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक केली. जसबीर सिंग याचे ‘जान महल’ नावाचे यूट्यूब चॅनल असून याचे 11 लाखांहून अधिक सब्स्क्रायबर्स आहेत. पंजाब पोलिसांच्या स्टेट स्पेशल ऑपरेशन सेल (SSOC) मोहाली यांनी ही कारवाई केली आहे.

पंजाबचे डीजीपी गौरव यादव यांनी सांगितले की, जसबीर सिंग हा पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणेशी (ISI) संबंधित असलेल्या हसन अली उर्फ जट्ट रंधावा याच्या संपर्कात होता. तसेच तो हरियाणातील यूट्यूबर ज्योति मल्होत्रा आणि एहसान-उर-रहीम उर्फ दानिश यांच्या संपर्कात होता. ज्योति मल्होत्राला यापूर्वीच हेरगिरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे.

तपासातून समोर आले आहे की, जसबीर सिंग याने 2020, 2021 आणि 2024 मध्ये तीन वेळा पाकिस्तानचा दौरा केला होता. त्याच्या मोबाईलमध्ये अनेक पाकिस्तानी संपर्क क्रमांक आढळले असून, त्यांची सध्या फॉरेन्सिक तपासणी सुरू आहे. ज्योति मल्होत्राच्या अटकेनंतर जसबीरने त्याच्या पाकिस्तानी हँडलर्सशी झालेल्या संपर्काचे सर्व डिजिटल पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला, असे डीजीपी गौरव यादव यांनी सांगितले. या अटकेमुळे पंजाब आणि हरियाणामध्ये पाकिस्तानशी संबंधित हेरगिरी नेटवर्कविरुद्धच्या कारवाईला आणखी बळ मिळाले आहे. दरम्यान, याआधी पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशातून 12 जणांना अशाच हेरगिरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;