फिल्म इंडस्ट्रीत 8 तासांच्या शिफ्टवरून वाद

फिल्म इंडस्ट्रीत 8 तासांच्या शिफ्टवरून वाद

अभिनेत्री दीपिका पदुकोण आगामी ‘स्पिरीट’ चित्रपटातून बाहेर पडल्याची मोठी चर्चा इंडस्ट्रीत होतेय. एका मुलीची आई झालेल्या दीपिकाने या चित्रपटासाठी आठ तासांच्या शिफ्टची अट ठेवल्याचे समजते. दिग्दर्शक संदीप वंगा यांनी ही मागणी मान्य केली नाही. त्यानंतर दीपिकाने ‘स्पिरीट’ चित्रपट सोडल्याने चर्चा रंगली. तेव्हापासून आठ तासांच्या शिफ्टवरून इंडस्ट्रीत नव्या वादाला तोंड फुटलंय. अनेकांनी दीपिकाचे समर्थन केलंय, तर काहींनी तिची मागणी अवास्तव असल्याचे म्हटले.

प्रसिद्ध दिग्दर्शक मणिरत्नम यांनी ‘ठग लाईफ’ चित्रपटाच्या प्रदर्शनदरम्यान दीपिकाची मागणी योग्य असल्याचे वक्तव्य केले. मणिरत्नम म्हणाले, मला आनंद आहे की दीपिका आज अशा स्थितीत आहे की ती अशी मागणी करू शकते. एका मुलाखतीत राधिका आपटेला विचारण्यात आले की फिल्म इंडस्ट्रीत नवीन मातांना प्रेरणा आणि समर्थन मिळतंय का? यावर उत्तर देताना राधिका म्हणाली, मला समजून चुकलंय की हिंदुस्थानात ज्या पद्धतीने काम होतं, ते मला शक्य होणार नाही. कारण तिथे रोजची सामान्य शिफ्ट कमीत कमी 12 तासांची असते. त्यात मेकअप टाईमचा समावेश नसतो. त्यात प्रवासाचा वेळ असतो. तसेच कोणतेही शूटिंग वेळेवर संपत नाही. आणि जरी शूटिंग वेळेवर संपले तरी कसेही 15 तास ड्युटीचे होतात.

माझ्या करियरमध्ये मी 16-17 तास काम केलंय. मात्र आता शक्य होणार नाही. कारण तसं केल्यास मी माझ्या मुलीला वेळ देऊ शकणार नाही. याआधी अजय देवगण आणि काजोल यांनीही दीपिकाचे समर्थन केलेले आहे. अभिनेता सैफ अली खाननेही कुटुंबाला प्राधान्य दिले पाहिजे, असे वक्तव्य केले.

दीपिका पदुकोणला कलाकारांचा पाठिंबा

काही दिवसांपूर्वी राधिका आपटे आई झाली. तिला मुलगी झाली आहे. राधिका म्हणते, यापुढे इंडस्ट्रीत काम करताना कॉण्ट्रक्टमध्ये काही नव्या अटी जोडाव्या लागतील. मला माहीत आहे की अनेकांना या अटींचा त्रास होईल. आपल्या संस्कृतीत असेच आहे की पुरुषांनी मुलांकडे लक्ष दिले नाही तरी चालेल, पण आई बनलेल्या स्त्रिया असे करू शकत नाही.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;