Skin Care- तिशीनंतर तरुण तेजस्वी दिसण्यासाठी आहारात ‘हे’ पदार्थ समाविष्ट करा

Skin Care- तिशीनंतर तरुण तेजस्वी दिसण्यासाठी आहारात ‘हे’ पदार्थ समाविष्ट करा

तिशीनंतर प्रत्येक स्त्री पुरुषाच्या त्वचेमध्ये बदल व्हायला सुरुवात होते. अनेकांमध्ये हे बदल फारच पटकन दिसून येतात. त्वचेची निगा राखण्यासाठी त्वचेमध्ये कोलेजन हे फार महत्त्वाची भूमिका निभावते. आपली त्वचा सुंदर आणि चमकदार असायला हवी असे प्रत्येकीला वाटते. परंतु चमकदार आणि तजेलदार त्वचा हवी असल्यास, त्वचेतील कोलेजनचे उत्पादन वाढवणे आवश्यक आहे. कोलेजन हे एक प्रथिन आहे जे आपल्या त्वचेत नैसर्गिकरित्या आढळते. कोलेजनमुळे चेहरा तरुण आणि चमकदार बनतो.

शरीरामध्ये कोलेजनची कमतरता आढळल्यास, हाडांचे आणि त्वचेचे विकार सुरु होतात. शेवटी कोलेजन म्हणजे काय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. वास्तविक, कोलेजन हे एक प्रोटीन आहे जे आपल्या त्वचेत नैसर्गिकरित्या आढळते. वयोमानापरत्वे कोलेजन हे खूप कमी होत असते. त्यामुळेच कोलेजन वाढविण्यासाठी आपल्याला आहारात बदल करणे हे खूप गरजेचे आहे.

Skin Care- कॉफी फक्त पिऊ नका, चेहऱ्यावरही लावा! वाचा सविस्तर

हिरव्या पालेभाज्या- हिरव्या भाज्यांमध्ये क्लोरोफिल असते ज्यामुळे त्वचेतील कोलेजन वाढते. रोजच्या आहारात याचा समावेश केल्यास त्वचा तजेलदार होऊन त्वचा निरोगी राहते.

फॅटी फिश- आहारात मासे खाणे हे कोलेजन वाढविण्याचा उत्तम स्त्रोत आहे. माशांमध्ये ओमेगा 3 मुबलक प्रमाणात असल्यामुळे कोलेजन वाढीसाठी हे खूप उपयुक्त मानले जाते.

लिंबूवर्गीय फळं- तुमच्या दैनंदिन आहारात व्हिटॅमिन सी समृद्ध असलेल्या लिंबूवर्गीय फळांचा समावेश केला तर कोलेजनचे प्रमाण वाढू शकते. त्यामुळे संत्री, द्राक्षं, लिंबू असे किमान एक तरी लिंबूवर्गीय फळ खावे. बेरी देखील कोलेजनचा उत्कृष्ट स्त्रोत आहेत.

लसूण- तुम्ही रोज लसणाचे सेवन केले तर ते तुमच्या त्वचेसाठी खूप फायदेशीर ठरू शकते. तुमचे कोलेजन वाढवण्यासाठी खूप उपयुक्त आहे. वास्तविक त्यात सल्फरचे प्रमाण जास्त असते.

ओवा- ओव्यामुळेही आपल्या शरीरामध्ये कोलेजन वृद्धी होते. ओव्यामध्ये असणारे सिलिकाॅन कोलेजनवाढीसाठी महत्त्वाचे मानले जातात.

(कोणतेही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

भूमिपुत्रांना न्याय मिळण्यासाठी ग्रामस्थ आक्रमक, कोका कोलाविरुद्ध अजगणी येथे मूक मोर्चा भूमिपुत्रांना न्याय मिळण्यासाठी ग्रामस्थ आक्रमक, कोका कोलाविरुद्ध अजगणी येथे मूक मोर्चा
अजगणी येथील विस्तारित लोटे वसाहतीमधील 88 एकर जमिनीवर होत असलेल्या कोका कोला कंपनीच्या प्रकल्पात स्थानिक भूमिपुत्रांवर होत असलेल्या अन्यायाच्या निषेधार्थ...
जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाचे आज उद्घाटन
धक्कादायक! सांडपाणी प्रक्रिया प्लाण्टमध्ये कोरोना विषाणूचे जनुकीय अंश, एनसीएलच्या तपासातून माहिती समोर
कोरोनाग्रस्तांची संख्या वाढतेय, देशात आतापर्यंत 4 हजार 866 रुग्ण
भाजपच्या ‘संकल्प’पत्राचा शिवसेनेकडून पंचनामा, शिवसैनिकांच्या प्रश्नावर मंत्री अतुल सावे निरुत्तर
पोलिसांनी वाचवले वृद्ध डॉक्टरचे 1 कोटी 29 लाख रुपये
युक्रेनच्या ‘ऑपरेशन स्पायडरवेब’ला रशियाचा करारा जवाब; बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा वर्षाव, ड्रोन हल्ल्यांनी केलं बेजार