लष्करचा सह-संस्थापक अमीर हमजा अपघातात गंभीर जखमी, लाहोरच्या रुग्णालयात मोजतोय अखेरच्या घटका
हाफिज सईदचा जवळचा सहकारी आणि हिंदुस्थानचा मोठा शत्रू अमीर हमजाबाबत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अमीर हमजा रुग्णालयात उपचारांसाठी दाखल झाला आहे. त्याची प्रकृती गंभीर असल्यामुळे तो सध्या तो शेवटच्या घटका मोजत आहे. आमिर हमजा हा हिंदुस्थानातील दहशतवादी हल्ल्यांचा मोठा सूत्रधार आहे. दहशतवादी हमजा हा लष्कर-ए-तोयबाचा सह-संस्थापक असूनतो हिंदुस्थानचा आणि अमेरिकेचाही मोठा शत्रू आहे.
टाईम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तानुसार, अमीर हमजा लाहोरमधील त्याच्या निवासस्थानी झालेल्या अपघातात गंभीर जखमी झाला आहे. त्यामुळे हमजाला लाहोरमधील लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान काही माध्यमांमध्ये हमजाची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे, परंतु या बातम्या खोट्या असल्याचे स्पष्ट झाले आहे. याशिवाय हमजाच्या प्रकृतीबाबत पाकिस्तानी अधिकाऱ्यांकडून कोणतेही अधिकृत विधान आलेले नाही.
अमीर हमजा हा अफगाण मुजाहिदीनच्या लष्कर-ए-तोयबाचा टोळीतील प्रमुख दहशतवादी होता. 2000 पासूनच हमजा हिंदुस्थानवर लक्ष ठेऊन होता. 2005 मध्ये बंगळुरू येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सवर झालेल्या हल्ल्याचा कट त्यानेच रचला होता. हमजा हा दहशतवादी हाफिज सईदचा जवळचा मानला जातो. 2012 मध्ये अमेरिकेने त्याला जागतिक दहशतवादी घोषित केले होते. तो मूळचा पाकिस्तानातील पंजाबमधील गुजरांवाला येथील आहे.
दोन्ही देशांमध्ये युद्धबंदीबाबत करार
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर हिंदुस्थानने ऑपरेशन सिंदूर सुरू केले . याअंतर्गत, त्यांनी पाकिस्तान आणि पीओकेमधील नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. या काळात अनेक दहशतवादी मारले गेले. यानंतर पाकिस्तानने हिंदुस्थानातील अनेक शहरांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यावर हिंदुस्थानी सैन्याने योग्य प्रत्युत्तर दिले आणि पाकिस्तानचे मोठे नुकसान केले. सध्या दोन्ही देशांमध्ये युद्धबंदीबाबत करार झाला आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List