Parliament Session 2025 – ऑपरेशन सिंदूरवर संसदेचं विशेष अधिवेशन घेण्यापासून सरकारने पळ काढला! पावसाळी अधिवेशनाची तारीख घोषित

Parliament Session 2025 – ऑपरेशन सिंदूरवर संसदेचं विशेष अधिवेशन घेण्यापासून सरकारने पळ काढला! पावसाळी अधिवेशनाची तारीख घोषित

ऑपरेशन सिंदूरवर संसदेचं विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी विरोधी पक्षांनी केली आहे. विरोधी पक्ष आक्रमक असताना केंद्र सरकारने संसदेच्या पावसाळी अधिवेशनाची तारीख घोषित केली आहे. संसदेचं पावसाळी अधिवेशन 21 जुलैपासून सुरू होणार आहे. त्यामुळे ऑपरेशन सिंदूरवर संसदेचं विशेष अधिवेशन घेण्यापासून केंद्र सरकारने पळ काढल्याची टीका होत आहे.

सर्व जगाला सांगता पण संसदेला नाही, ऑपरेशन सिंदूर’वर विशेष अधिवेशन बोलवा; इंडिया आघाडीची पंतप्रधान मोदींकडे पत्राद्वारे मागणी

संसदेचं पावसाळी अधिवेशन 21 जुलै ते 12 ऑगस्ट दरम्यान होणार आहे. एकूण 23 दिवसांच्या या अधिवेशनात ऑपरेशन सिंदूर, पाकिस्तानशी अचानक झालेली शस्त्रसंधी, राष्ट्रीय सुरक्षा, अर्थव्यवस्था आणि अनेक विधेयकांवर चर्चा होण्याची अपेक्षा आहे. तीन महिन्यांहून अधिकच्या खंडानंतर संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज हे 21 जुलैला सकाळी 11 वाजता सुरू होईल. या वर्षी संसदेचं पहिलं अर्थसंकल्पीय अधिवेशन हे 31 जानेवारीला सुरू झालं होतं. त्यानंतर 4 एप्रिलला संसदेचं कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आलं होतं.

नाम नरेंदर, काम सरेंडर! ट्रम्प यांचा एक फोन येताच ‘जी हुजूर’ करत मोदी शरण गेले; राहुल गांधी यांचा जोरदार निशाणा

ऑपरेशन सिंदूरवर संसदेचं विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी विरोधी पक्षांनी गेल्या अनेक दिवसांपासून लावून धरली आहे. यासाठी 16 विरोधी पक्षांनी पंतप्रधान मोदींना पत्रही लिहिले आहे. तसेच  दुसरीकडे संसदेच्या पावसाळी अधिवेशनाची तारीख केंद्र सरकारने घोषित केली आहे. यामुळे ऑपरेशन सिंदूर आणि पाकिस्तानच्या मुद्द्यावर संसदेचं विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी सरकारने डावलली आहे. यामुळे विरोधी पक्ष सरकार विरोधात आणखी आक्रमक होण्याची चिन्हे आहेत.

ऑपरेश सिंदूर, शस्त्रसंधी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून करण्यात येणाऱ्या दाव्यांवर संसदेचं विशेष अधिवेशन बोलवावं, अशी मागणी विरोधी पक्षांनी केली आहे. तसेच विरोधी पक्षांनी प्रश्नही उपस्थित केले आहेत. ऑपरेशन सिंदूरवरची माहिती सर्व जगाला दिली जातेय पण संसदेला नाही, अशी टीका विरोधी पक्षांनी केली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Photo – चिनाब नदीवर बांधलेल्या जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाची आकर्षक दृष्ये Photo – चिनाब नदीवर बांधलेल्या जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाची आकर्षक दृष्ये
    पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी जम्मू-कश्मीर दौऱ्यावरून असून त्यांनी 46 हजार कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांपैकी सर्वात महत्त्वाचा आणि मोठ्या
Cooking Tips- स्वयंपाक रुचकर, चविष्ट आणि पौष्टिक करायचंय, मग या टिप्स वापराच
RBI च्या रेपो रेटच्या घोषणेने शेअर बाजार वधारला; सेन्सेक्सचा 82000 तर निफ्टीचा 25000 चा टप्पा पार
प्रसिद्ध मल्याळम अभिनेता शाइन टॉम चाकोचा भीषण अपघात; वडिलांचा मृत्यू; आई, भावावर उपचार सुरू
राज्य सरकारची गाडी खिळखिळी झालेली आहे, संजय राऊत यांची टीका
कुंकवाचं झाड लावण्यापेक्षा संसदेत अधिवेशन बोलवा आणि प्रश्नांची उत्तरं द्या, संजय राऊत यांचा घणाघात
बकरी ईदला गोहत्या झाली तर रक्ताचे पाट वाहतील; उत्तर प्रदेशच्या मंत्र्याचे वादग्रस्त विधान